'मराठी पाटीचा की दुकानाच्या काचांचा खर्च जास्त?'

मराठी पाट्या लावण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाची लढाई
'मराठी पाटीचा की दुकानाच्या काचांचा खर्च जास्त?'
Summary

मराठी पाट्या लावण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाची लढाई

राज्यातील (Maharashtra) सर्व दुकाने आणि आस्थापनांचे फलक (Marathi boards on shops) म्हणजेच पाट्या मराठी भाषेत असाव्यात, या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर सध्या महाराष्ट्रातून सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. अनेक दिग्गज राजकीय मंडळींनीही यात उडी घेतली आहे. पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांनीही यासंबंधी ठोस भूमिका घेतल्याचे समोर येत आहे. ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर शिवसेना (Shivsena) आणि मनसेत (Manase) श्रेयवादाची लढाई सुरु झाली. मराठी पाट्यांच्या निर्णयाचे यश माझ्या महाराष्ट्र सैनिकांचेच आहे. ते लाटण्याचा आचरटपणा कोणीही करु नये, असे मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठणकावून सांगितले होते. आता मनसेच्या एका नेत्याने यासंदर्भात ट्वीट केले आहे.

'मराठी पाटीचा की दुकानाच्या काचांचा खर्च जास्त?'
'तुम्ही कोणते टॉनिक घेता? यावर एखादा उपाय तरी सूचवा'

मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्वीट करत याविषयी आणखी एक मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणतात, ज्या व्यापारांचा मराठी 'पाटी'ला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे, पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे, की दुकानाच्या काचा बदलण्याचा? असा सवाल करत त्यांनी थेट इशाराच दिला आहे.

दरम्यान, या निर्णयाविरोधात फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. त्यामुळे दुकानांच्या पाटीवर मोठ्या अक्षरात नाव लिहलाना कोणत्या भाषेचा वापर करावा, हा व्यापाऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय व्यापाऱ्यांवर अन्यायकारक ठरेल. दुकानदारांना व्होटबँक पॉलिटिक्सपासून दूर ठेवा. दुकानाला मराठी पाट्या लावू, पण मोठ्या अक्षरातील मराठी पाट्यांची सक्ती नको, अशी भूमिका विरेन शाह यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'मराठी पाटीचा की दुकानाच्या काचांचा खर्च जास्त?'
Maharashtra | मंत्र्यांच्या बंगल्यांना आता किल्ल्यांची नावे;आदित्य ठाकरेंच्या बंगल्याचे नाव 'रायगड';पाहा व्हिडिओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com