मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक; गुजराती पाट्यांना डच्चू देऊन केला निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manse

मराठी मधूनच पाटी लावण्यासंदर्भात मनसेकडून दुकानदारांना आवाहन केले जात आहे.

मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक

राज्यातील दुकानांवर ठळक आणि मोठ्या अक्षरात मराठी पाट्या लावण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. (Marathi boards in shops) यामध्ये आता अनेक दिग्गज राजकीय मंडळींनीही वक्तव्य केली आहेत. पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनीही यासंबंधी ठोस भूमिका घेतली आहे. ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर शिवसेना (Shivsena) आणि मनसेत (Manase) श्रेयवादाची लढाई सुरु झाली. दरम्यान आता पुन्हा एकदा मराठी पाट्यांच्या मुद्द्यांवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईतील (Mumbai) बोरिवली पश्चिम येथील गुजराती नाव असलेल्या दुकानाबाहेर मराठी पाटी लावून निषेध व्यक्त केला जात आहे. मराठी मधूनच पाटी लावण्यासंदर्भात मनसेकडून (Manase) दुकानदारांना आवाहन केले जात आहे.

हेही वाचा: ...त्यासाठी अकलेची गरज नसते; CM ठाकरेंचा विरोधकांना टोला

आज सकाळीही मनसेच्या नेत्याने ट्वीट करुन व्यापारांना इशारा दिला होता. यात त्याने ज्या व्यापारांचा मराठी 'पाटी'ला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे, पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे, की दुकानाच्या काचा बदलण्याचा? असा सवाल विचारला होता. दरम्यान, या निर्णयाविरोधात फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. त्यामुळे दुकानांच्या पाटीवर मोठ्या अक्षरात नाव लिहिताना कोणत्या भाषेचा वापर करावा, हा व्यापाऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय व्यापाऱ्यांवर अन्यायकारक ठरेल. दुकानदारांना व्होटबँक पॉलिटिक्सपासून दूर ठेवा. दुकानाला मराठी पाट्या लावू, पण मोठ्या अक्षरातील मराठी पाट्यांची सक्ती नको, अशी भूमिका विरेन शाह यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा: आणखी आठ आमदार पक्षात; अखिलेश यादव म्हणतात, 'या भाजपच्या हिट विकेट्स'

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top