Fractured Freedom Controversy: दादा चिडले, हे सरकार म्हणजे...

मराठी साहित्यामध्ये सध्या एका वेगळ्या कारणामुळे मोठा वाद निर्माण होताना दिसतो आहे.
Fractured Freedom Controversy
Fractured Freedom Controversyesakal

Marathi Book Fractured Freedom controversy viral : मराठी साहित्यामध्ये सध्या एका वेगळ्या कारणामुळे मोठा वाद निर्माण होताना दिसतो आहे. त्यामुळे वेगळी परिस्थिती उद्धभवली आहे. त्याची दखल मराठी साहित्यातील वेगवेगळ्या साहित्यिकांनी घेत आपला निषेधही नोंदवला आहे.

यशवंतराव चव्हाण वाड्मय पुरस्कारांमधील फ्रॅक्चर्ड फ्रीडम - तुरुंगातील आठवणी व चिंतन या कोबाड गांधी लिखित पुस्तकाला प्रौढ वाड्मय अनुवादित श्रेणीत पुरस्कार जाहिर झाला होता. मात्र या पुस्तकामध्ये नक्षलवादाचे समर्थन करण्यात आले आहे असा ठपका ठेवून तो पुरस्कार परत घेण्यात आला आहे. त्यामुळे संतापलेल्या साहित्यिकांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

एवढेच नाहीतर महाराष्ट्र राज्य साहित्य महामंडळाच्या सदस्य मंडळानं राजीनामा दिला आहे. त्यामध्ये डॉ. प्रज्ञा दया पवार, कवयित्री नीरजा यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच भुरा या प्रसिद्ध आत्मचरित्राचे लेखक शरद बावीस्कर यांच्याही पुस्तकाला पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांनी सध्या निर्माण झालेल्या वादामुळे तो पुरस्कार परत करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे साहित्यिक क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

यासगळ्या परिस्थितीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, साहित्यिक क्षेत्रामध्ये नेमके काय सुरु आहे कळत नाही. एखाद्या पुस्तकाला पुरस्कार देणे, तो पुन्हा परत घेणे हे शोभण्यासारखे नाही. ज्या कमिटीनं तो शिफारस करुन तो पुरस्कार दिला त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. असे मला वाटते. ते अनुवादीत केलेले पुस्तक आहे. मुळात साहित्य क्षेत्रात सरकारनं लक्ष घालू नये. त्यांच्याकडून आपल्याला काही धोका आहे का, त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यातून आपल्या सुरक्षिततेचा भंग तर होत नाही ना याची खात्री करुन घ्यावी. मात्र या प्रकरणात असे काही दिसत नाही.

साहित्यातातला दर्दी म्हणून या प्रकरणाचा मी निषेध करतो आहे. या प्रकरणाचा अतिरेक करु नये. उगाचच त्या प्रकरणामुळे वातावरण अशांत करु नये अशीही प्रतिक्रिया अजित पवार यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com