
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. यात ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ आणि ‘खालिद का शिवाजी’ या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाचीही विशेष निवड करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी रविवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत दिली.