रुपाली पाटील ठोंबरे यांच्यानंतर अभिजित पानसेही सोडणार 'मनसे'?

सध्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठमोठ्या घडामोडी होत असताना मनोरंजन क्षेत्रामध्ये देखील वेगवेगळ्या घटना घडत आहेत.
रुपाली पाटील ठोंबरे यांच्यानंतर अभिजित पानसेही सोडणार 'मनसे'?

सध्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठमोठ्या घडामोडी होत असताना मनोरंजन क्षेत्रामध्ये देखील वेगवेगळ्या घटना घडत आहेत. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधले जात आहे. विशेष करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (MNS) काही कार्यकर्ते, जुने नेते तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. आज सकाळी पुण्यातील मनसेच्या वरिष्ठ नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. त्यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक अभिजित पानसे (Abhijit Panse) हे देखील मनसेला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

आपल्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणून अभिजित पानसे यांची ओळख आहे. ते मनसेमध्ये काही वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांचा एक सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday samant) यांची भेट घेतल्याचे दिसत आहे. याप्रसंगी युवासेना सचिव वरूण सरदेसाई देखील उपस्थित होते. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहीती मिळतेय. रुपाली पाटील ठोंबरे (rupali patil thombare) यांच्या पाठोपाठ अभिजीत पानसे ही मनसेला जय महाराष्ट्र (Jay maharashtra) करणार का..? हा सवाल सोशल मीडियातून उपस्थित केला जात आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांच्यानंतर अभिजित पानसेही सोडणार 'मनसे'?
शरद पवार साहेबांना आशीर्वाद देतील असे ‛हात’ नाहीत - रुपाली पाटील
रुपाली पाटील ठोंबरे यांच्यानंतर अभिजित पानसेही सोडणार 'मनसे'?
रुपाली पाटील 'वेळ' साधणार? मनसेला 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर...

गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी दिसून आल्या आहेत. पक्षातील काही व्यक्तींनी पक्षांतर करुन दुसऱ्या पक्षाची वाट धरली आहे.त्यामुळे सोशल मीडियातून चाहते, कार्यकर्ते यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. आगामी काळात पानसे काय निर्णय घेतात याकडे त्यांचे चाहते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com