शरद पवार साहेबांना आशीर्वाद देतील असे ‛हात’ नाहीत - रुपाली पाटील

मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करताना रुपाली पाटील Rupali Patil यांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे अकाउंट टॅग केले आहे.
Rupali Patil
Rupali PatilSocail Media
Summary

मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करताना रुपाली पाटील Rupali Patil यांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे अकाउंट टॅग केले आहे.

मनसेला (MNS) जय महाराष्ट्र केल्यानंतर माजी नगरसेवक रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी आपण महाविकास आघाडीतच (Maha Vikas Aghadi) स्थिरावणार असल्याचं सांगितलं आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की, माझ्याकडे भरपूर पर्याय आहेत पण मी दुसऱ्या पक्षात जायच्या उद्देशानं मनसे सोडली नाही. घुसमट आणि त्रासातून बाहेर पडण्यासाठी हा निर्णय़ घेतला आहे.

रुपाली पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानतंर पुढे काय याबाद्दल माहिती देताना म्हटलं की, पुढचा निर्णय मी लवकरच कळवेन. आता यानंतर त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये रुपाली पाटील यांनी म्हटलं की, आज शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार. रुपाली पाटील यांनी ट्विटरवर ही पोस्ट करताना राष्ट्रवादी, शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसलासुद्धा (Congress) टॅग केलं आहे.

दरम्यान, रुपाली पाटील यांनी महाविकास आघाडीस स्थिरावणार असं म्हटलं असलं तरी कोणत्या पक्षात जाणार हे मात्र स्पष्टपणे सांगितलेलं नाही. त्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या संपर्कात आहेत. त्यापैकी एका पक्षात प्रवेश करतील असा अंदाज आहे. राजीनामा देण्याआधी रुपाली यांनी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची भेट घेतली होती. सह्याद्री अथितीगृहावर झालेल्या भेटीचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर त्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली. तर त्याआधी रुपाली पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटल्या होत्या त्यामुळे राष्ट्रवादीत जाणार असेही म्हटले जात आहे.

Rupali Patil
"माझ्यासमोर दोन पर्याय..", रुपाली पाटील जाणार 'या' पक्षात

कोण आहेत रुपाली पाटील?

रुपाली पाटील या पेशाने वकील आहेत. मनसेच्या स्थापनेपासून गेली १४ वर्षे त्या राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत त्या मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाल्या. पुढच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानतंरही त्या राजकारणात सक्रीय असून विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांची कसबा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्याऐवजी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना तिकिट मिळाले. त्यामुळे नाराज झालेल्या रुपाली पाटील यांच्या मनात तिकिट कापल्याची भावना होतीच. अनेकदा मुलाखतींमधून त्यांनी पक्षातील अंतर्गत वादावर अप्रत्यक्ष वक्तव्यं केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com