छगन भुजबळ आणि कुटुंबीयांची चौकशी, अटकेचा घटनाक्रम 

residenational photo
residenational photo

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज

- 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले 
- महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र सदनप्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप करून छगन भुजबळांसह पंकज व समीर भुजबळ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) अरुण देवधर, दीपक देशपांडे, मुख्य अभियंता माणिक शहा, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ बिपिन संख्ये, कार्यकारी अभियंता अनिलकुमार गायकवाड, मे. चमणकर एन्टरप्राइजेसचे कृष्णा चमणकर, प्रसन्न चमणकर, प्रविणा चमणकर, प्रणिता चमणकर, तसेच भुजबळ यांच्या मुलांच्या कंपनीशी संबंधित कर्मचारी तन्वीर शेख, इरम शेख, संजय जोशी, गीता जोशी यांच्यासह 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 
- 16 जून 2015 ः महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई, नाशिक, मनमाड, येवला आणि पुणे येथील विविध घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. त्यात नाशिकमधील भुजबळ फार्म येथील छगन भुजबळ यांचे निवासस्थान, कार्यालय, येवला आणि मनमाडमधील निवासस्थान आणि कार्यालय या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्याचा समावेश होता. त्याचवेळी मुंबईतील वरळी, माझगाव, चर्चगेट, सांताक्रूझ, दादर येथेही त्यांच्या घरांवर आणि कार्यालयावरही छापे टाकण्यात आले. एकूण 25 हून अधिक अधिकारी छापासत्रात सहभागी झाले होते. 
- 17 जून 2015 ः छगन भुजबळांविरोधात महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, समता परिषद, भुजबळ समर्थकांकडून रास्ता रोको आंदोलन 
- 1 फेब्रुवारी 2016 ः अमेरिकन कॉंग्रेसने (संसदेने) सामाजिक न्याय व शैक्षणिक सहकार्य या विषयासाठी आमंत्रित केल्याने छगन भुजबळ पहाटे अमेरिका दौऱ्यावर 
- 1 फेब्रुवारी 2016 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना "ईडी'कडून चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यांना त्याचदिवशी अटक करण्यात आली आणि 9 मालमत्तांवर "ईडी'ने छापे टाकले 
- 4 फेब्रुवारी 2016 ः महाराष्ट्र सदन व इतर प्रकरणी सक्तवसुली महासंचालनालयाने काळा पैसाविरोधी दाखल केलेल्या गुन्ह्यात छगन भुजबळ, तसेच पंकज आणि समीर भुजबळ हे संचालक असलेल्या विविध कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले. त्यात मुंबईतील सांताक्रूझ, वरळी येथील भुजबळांच्या निवासस्थानांसह वांद्रे येथील एमईटी संस्थेचा छापे टाकण्यात आलेल्यांत समावेश होता 
- 14 मार्च 2016 ः महाराष्ट्र सदन, इंडियाबुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांप्रकरणी छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले. सकाळपासून भुजबळ यांची मुंबईतील "ईडी'च्या मुख्यालयात चौकशी सुरू होती. 11 तासांच्या चौकशीनंतर भुजबळ यांना भारतीय दंडविधान 19/1 काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक 
- 15 मार्च 2016 ः सकाळी छगन भुजबळ यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, छगन भुजबळ यांची चौकशी सुरू असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी "ईडी'च्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. त्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. "ईडी'च्या कार्यालयात दाखल होत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भुजबळ आपण चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. सरकारकडून सूडाचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला 
महाराष्ट्र सदन, इंडियाबुल्स या व्यवहारांतून भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या 870 कोटीं बाबत महासंचालनालयाकडून चौकशी सुरू आहे, असे सांगण्यात आले 
- 10 मे 2016 ः छगन भुजबळ यांचा पीएमएलए न्यायालयाकडे आजारपणामुळे जामिनासाठी अर्ज दाखल केला. तो 14 मे 2016 ला फेटाळला 
- 21 मे 2016 ः छगन भुजबळ यांनी आजारपणामुळे उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज 
- 31 मे 2016 ः मुंबई एज्युकेशनल ट्रस्टला शैक्षणिक संकुलासाठी नाशिक येथील गोवर्धन शिवारात दिलेली जमीन जप्त करण्याची कारवाई राज्य सरकारकडून करण्यात आली. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा भुजबळ कुटुंबीयांचा आरोप 
- 16 जून 2016 ः न्यायालयाने छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळला 
- 22 जून 2016 ः छगन भुजबळ, समीर भुजबळ व पंकज भुजबळ यांच्यासह इतरांना "एसीबी'कडून जामीन मंजूर 
- 12 ऑगस्ट 2016 ः गोवर्धन शिवारातील जप्त जमीनप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारविरोधात निर्णय देत ट्रस्टला जमीन परत करण्याचे आदेश 
- 3 ऑक्‍टोंबर 2016 ः छगन भुजबळांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत नाशिकमध्ये मोर्चा 
- 10 नोव्हेंबर 2016 ः अटकेला विरोध करत छगन भुजबळ यांनी हबियस कॉपर्सची याचिका दाखल करून पीएमएलए न्यायालयात जामीन अर्ज 
- 17 नोव्हेंबर 2016 ः महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ यांनी अटकेला विरोध करत जामीन मिळविण्यासाठी नवीन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल 
- 21 जानेवारी 2017 ः आमदार पंकज भुजबळ यांना "ईडी'कडून दोन लाखांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर 
- 17 जुलै 2017 ः छगन भुजबळ यांनी न्यायालयाच्या परवानगीनंतर राष्ट्रपतिपदासाठी पार पडलेल्या मतदानाचा हक्क मुंबई विधानमंडळात बजावला 
- 28 जुलै 2017 ः छगन भुजबळ व त्यानंतर एक दिवसाने समीर भुजबळ यांचा जामिनासाठी पीएमएलए न्यायालयात अर्ज 
- 22 नोव्हेंबर 2017 ः सर्वोच्च न्यायालयाचा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील कलम 45 घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा 
- 22 ते 24 आणि 28 नोव्हेंबर 2017 ः जामिनावरील सुनावणीवेळी "ईडी'चे वकील गैरहजर 
- 5 डिसेंबर 2017 ः युक्तिवाद करण्यासाठी "ईडी'ला शेवटची संधी देत युक्तिवाद पूर्ण. निर्णयासाठी दिली 18 डिसेंबर 2017 ही तारीख 
- 18 डिसेंबर 2017 ः पीएमएलए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला 
- 2 जानेवारी 2018 ः देशातील जिल्हाधिकारी व तहसील कार्यालये याठिकाणी भुजबळ समर्थकांकडून निदर्शने 
- 13 जानेवारी 2018 ः न्यायालयाने 18 डिसेंबरला फेटाळलेल्या जामीन अर्जावरील निकालाची प्रत दिली 
- 20 जानेवारी 2018 ः सर्वपक्षीय भुजबळ समर्थकांची नाशिकमध्ये अन्यायाच्या आरोपाबाबत बैठक 
- 23 जानेवारी 2018 ः इंदापूरमध्ये भुजबळ समर्थकांचा मोर्चा आणि पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 
- 24 जानेवारी 2018 ः "अन्याय पे' चर्चासंबंधी बैठक 
- 26 जानेवारी 2018 ः ग्रामसभांमध्ये भुजबळ कुटुंबीयांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निषेधाचे ठराव 
- 29 जानेवारी 2018 ः जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज आणि 26 फेब्रुवारी 2018 पर्यंत सुनावणी तहकूब 
- 10 फेब्रुवारी 2018 ः मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या नाशिक येथील चार महाविद्यालयांच्या अवास्तव शुल्काबाबत सुनील कर्वे व बाळासाहेब जांबूळकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवून याचिकाकर्त्यांना प्रत्येकी 50 हजारांचा दंड 
- 26 फेब्रुवारी 2018 ः उच्च न्यायालयात जामीन अर्जावर "मेन्शन'. त्यात 12 मार्च ही पुढील सुनावणीसाठी तारीख आणि न्यायालयीन कामकाज झाले नाही 
- 3 मार्च 2018 ः प्रकृतिअस्वस्थतेमुळे छगन भुजबळ जे. जे. रुग्णालयात दाखल 
- 15 मार्च 2018 ः पुढील उपचारासाठी केईएम रुग्णालयात छगन भुजबळ दाखल 
- 26 मार्च 2018 ः मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटकेला विरोध दर्शविणाऱ्या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या कारवाईबाबत केंद्र सरकार व "ईडी'ला नोटीस 
- 13 एप्रिल 2018 ः सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी जुलै 2018 ला प्रक्रियेत सामावून घेण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने जामीन अर्जाचे प्रकरण वेगाने हाताळण्याचे दिले आदेश 
- 24 एप्रिल 2018 ः समीर भुजबळ यांच्या जामीन अर्जावर सुनावणीसाठी दिली 20 जून 2018 तारीख 
- 2 मे 2018 ः उच्च न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणीत छगन भुजबळांच्या वकिलांचा युक्तिवाद 
- 3 मे 2018 ः "ईडी'च्या वकिलांचा युक्तिवाद आणि निकालाची दिली 4 मे 2018 तारीख 
- 4 मे 2018 ः छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज मंजूर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com