esakal | राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतन वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar workers

राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतन वाढ

sakal_logo
By
दगाजी देवरे


म्हसदी : महाराष्ट्रातील साखर कामगारांचा (Sugar workers) वेतन निश्चितीचा करार 31 मार्च 2019 रोजी संपला होता.त्यामुळे नवीन वेतन वाढ (Salary increase) करण्यासाठी राज्य सरकारने बारा नोव्हेंबर 20 20 रोजी नव्याने त्रिपक्षीय समिती नेमली होती.या समितीची गुरूवारी पुणे येथे बैठक होऊन बारा टक्के वेतन वाढीचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती त्रिपक्ष समितीचे सदस्य सुभाष काकूस्ते(साक्री)यांनी दिली.

हेही वाचा: हमीभावात वाढ, खरेदी केंद्रांचे काय?


वेतन वाढीमुळे अडीच लाख कामगारांना दरमहा अडीच ते तीन हजार पर्यंत फायदा होणार आहे.त्रिपक्ष समितीचे अध्यक्ष म्हणून जयप्रकाश दांडेगावकर यांची नियुक्ती झाली होती.साखर कारखान्याचे 15, साखर कामगारांचे 15 शिवाय शासनाचे प्रतिनिधी म्हणून साखर आयुक्त, कामगार आयुक्त यांचाही समावेश या समितीत केला गेला होता.समितीच्या अनेक वेळा बैठका होऊन निर्णय होत नव्हता.म्हणून उभय पक्षांनी खासदार शरदचंद्र पवार यांचा मध्यस्थीने ते सांगतील तो निर्णय मान्य करण्याचे ठरले होते. प्रमाणे शरद पवारांनी बारा टक्के वाढीचा तोडगा सुचवला होता तो दोघांनाही मान्य झाला.

अडीच लाख कामगारांना मिळणार लाभ


त्रीपक्षीय समितीची बैठक होऊन बारा टक्के वाढीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्याचा लाभ राज्यातील सुमारे अडीच लाख कामगारांना 1 एप्रिल पासून मिळणार आहे. या निर्णयानुसार साखर कामगारांना एक एप्रिल 2019 पासून सुमारे अडीच ते तीन हजारापर्यंत वेतनवाढ मिळणार आहे.यापुढे महागाई भत्त्याचा दर मागणी निर्देशांकानुसार पूर्वी दर पॉइंटला दोन रुपये 70 पैसे होता.तो यापुढे दोन रुपये 90 पैसे करण्यात आला आहे.त्याशिवाय घरभाडे भत्ता,धुलाई भत्ता, पाई भक्ता,मेडिकल अलॉन्स यामध्येही 12 टक्के वृद्धी होणार आहे.यापूर्वी वार्षिक वेतन वाढीचा होता त्यात एक वर्षाने गट करून 7,16 व 20 करण्यात आला आहे.

हेही वाचा: भारतातील ५ स्थळे जी दिसतात परदेशासारखी..तुम्ही नक्की भेट द्या !

या करारावर सदस्यांच्या लवकरच सह्या होऊन तसा शासकीय निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. बैठकीत अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या व्यतिरिक्त कारखान्याचे अन्य प्रतिनिधी तसेच शासकीय प्रतिनिधी म्हणून साखर आयुक्त शेखर गायकवाड,कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, समितीचे सदस्य सचिव कल्याण आयुक्त रविराज ईळवे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,खासगी कारखान्यांचे बी.बी.ठोंबरे,संघटनांचे प्रतिनिधी म्हणून कॉम्रेड सुभाष काकुस्ते(साक्री),तात्यासाहेब काळे,शंकरराव भोसले,राऊ पाटील,आनंदराव वाययकर उपस्थित होते.

loading image
go to top