esakal | दररोज काही झालं की टीका करणे चुकीचे..गडकरींचे म्हणणे योग्य !
sakal

बोलून बातमी शोधा

Gadkari-Khadse

दररोज काही झालं की टीका करणे चुकीचे..गडकरींचे म्हणणे योग्य !

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : दररोज काही झालं की टिका करणे चुकीचे आहे. त्यात सारखी टीका झाल्याने यंत्रणा नाउमेद होतात. याचा प्रशासनावर (administration) परिणाम होतो. त्यामुळे अश्या काळात टीका करू नये असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) म्हणाले, त्यांचे म्हणणे बरोबर असून त्यांच्या मताशी मी सहमत आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Ncp leader Eknath Khadse) यांनी म्हणाले.

(minister nitin gadkari corona situation opinion expressed eknath khadse agrees)

हेही वाचा: भाजप नेत्यांच्या धमक्यांना भुजबळ आणि मी घाबरत नाही !

भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल कोरोना बाबत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सह सर्व जणांना कोरोना काळात राजकारण न करण्याबाबत सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी राज्य सरकारच्या (State Government) कामाचे कौतुक केलं आहे.

फडणवीसांनी केवळ राजकारण केले

नितीन गडकरींच्या मतावर एकनाथ खडसेंना याबाबत माध्यम प्रतिनीधींनी विचारणी केली असता. खडसे म्हणाले, की विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोणा काळात राज्य सरकार ऊपाय करण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप केला. या सर्वांचे उत्तर नितीन गडकरी यांनी दिले आहे. मला नव्याने काही सांगण्याची गरज वाटत नाही.

हेही वाचा: जळगावला दिलासा..महिन्याभरात प्रथमच १५च्या आत मृत्यु !

हीच भूमिका मी सुद्धा मांडली होती

जगभरात परिस्थिती हलाखीची आहे, त्यामुळे आशा काळात कोणी राजकारण करू नये, सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाशी लढा द्यावा लागला असे मत गडकरींनी मांडले. हीच भूमिका मी सुद्धा यापूर्वी मांडली होती असे खडसे म्हणाले.