esakal | नाही भाव अंगी भूषण मिरवीतो जगी !
sakal

बोलून बातमी शोधा

Shri Sant Sena Maharaj

नाही भाव अंगी भूषण मिरवीतो जगी !

sakal_logo
By
टीम ई सकाळ


कोळशासी अग्नी वर्ण झाला शुभ्र l
अज्ञानाचे अश्रू निवळी गा ll
सेना म्हणे ऐसा लाभ आला हाती l
सुखे नाम चित्ती गाईन गा llजळगाव ः थोर विचारवंत, शास्त्रज्ञ कला, क्रिडा, साहीत्यिक, थोर महात्मे, साधू संतांनी आज अखंड भारत हा पावनभूमी आहे. याच भारतातील मध्यप्रदेश राज्यातील बांधवगड येथील नाभिक समाजाचे देवीदास व प्रेमकुंवरबाई यांच्या उदरी शके १२२३ वैशाख वद्य १२ इ.स.१३०१ रविवारी संत अवतार संत शिरोमनी श्री. संत सेना महाराजांचा (Shri Sant Sena Maharaj) जन्म झाला आणि हेच सेनाजी पुढे संबंध मानवतेचे कुलदैवत झाले, त्यांची आज पुण्यतिथी (Punyatithi) असून त्यांच्या पुण्यतिथी निमित्त तयार केलेला हा विशेष लेख..

हेही वाचा: अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सिध्दीविनायक ट्रस्टला साकडे


विश्वाला दिला संदेश..
तेराव्या शतकाचा उत्तरार्धातील संत सेना महाराज हे एक वारकरी संप्रदायी संतकवी होते. त्यांना शेना न्हाऊ, सेनाजी, सेना महाराज ह्या नावांनीही ते ओळखले जातात. सेनापती, सैन अशीही त्यांची नावे आढळतात. तर संत ज्ञानेश्‍वर, नामदेव यांच्या काळातील ते एक थोर भगवद्‌भक्त होते. सेनाजींचे वय जसजसे वाढत गेले तसतसे त्यानी अभंगातून समाज प्रबोधन करत गेले. समाजसेवा, राष्ट्रसेवा, अंभग, किर्तन ते करीत असत, हे कार्य करीत असतांना त्यांनी कधीच आपला व्यवसाय सोडला नाही. लोकांचे केस कापत असतांना ते स्वच्छता, समता व बंधुत्वता आणि एकतेसाठी प्रबोधन द्यायचे. लोकांचे ते अंतरअंगच नव्हे तर बाह्यअंग देखिल निर्मळ करीत असत. माणवालाच देव माना. माणसाला माणूस जोडा, संघटीत रहा असे संदेश त्यांनी अवघ्या विश्वाला दिलेला आहे.


नाही भाव अंगी l भूषण मिरवितो जगी
स्थिर नाही मन l सदा कुविषयाचे ध्यान
सेना म्हणे अपराधी l सांभाळावे कृपानिधी ll

हेही वाचा: प्रेमविवाहानंतर आठवला व्यवहार; पतीसह सहा जणांवर गुन्हा


पांडूरंगाने धारण केले सेनाजींचे रुप
असे कार्य करीत असतांना बांधवगडचा राजा वीरसिंग यांचे केस कापण्याचे काम सेनाजी करीत होते. एके दिवस आपल्या कामाचा भार अधिक वाढत गेल्याने ते राजाचे केस कापण्यासाठी वेळेवर हजर होऊ शकत नव्हते. तेव्हा राजाचे काम वेळेवर होत नसल्याने राजाचा चेहरा रागाने लालबुंध झाला होता .व तो रागाने सेनाची वाट बघत राजवाड्यात चकरा मारत होता.तेव्हा राजाचे रागावलेले मुख पांडूरंगाच्या निदर्शनास आले आणि मग साक्षात पांडूरंगानेच सेनाजींचे रुप धारण केले आणि राजा वीरसिंहाची मनोभावे सेवा केली. रागाने तापलेल्या राजाची 'न भूतो न भविष्यते' अशी सेवा आज पांडूरंगाच्या हाताने झाली होती. स्वच्छ मऊ हाताने दाढी कटींग झालेला राजाला आनंदीआनंद झाला होता. आणि पांडूरंग तेथून त्यांची सेवा करून निघुन गेले आणि मग आपले काम आटोपून लगबगीने सेनाजी तेथे आले व राजाला कटींग,दाढीसाठी आवाज देऊ लागले.बघतो तर काय राजा चकाचक झालेला दिसला. सेनाजींना मात्र हा काय प्रकार घडलेला आहे हे समजेना असं झालं होत. तेव्हा राजाच म्हणाला 'अरे सेनाजी तू तर आत्ताच माझे केस कापून गेला ना !परत कशाला आलास आणि बघ तु आज केलेल्या माझ्या सेवेने माझी आयुष्यभराची मरगळ दुर झालेली आहे, हे घे दक्षना...'आणि राजाने आपल्या ओंजळीतील हिरे ,मोहरा सेनाजींना दिले.आणि मग सेनाजींना उमज आली की,पांडूरंग आपल्याला प्रसन्न झाला आहे.खरोखरच पांडूरंगाने राजाची सेवा केलेली आहे.राजा विरसिंहाने संत सेना महाराजांचे बांधले मंदिर
राजा विरसिंह यांनी संत सेना महाराज यांची संतवृत्ती ओळखून त्यांना आपले गुरू केले होते. नंतर वद्य १२ शके १९९२ इ.स.१३७०रोजी मध्यप्रदेशातील बांधवगड येथे समाधी घेतली यानंतर राजा विरसिंहाने संत सेना महाराजांचे समाधी मंदिर बांधले.


हेही वाचा: योजनांचा लाभ मिळवून देणारे रॅकेट सक्रिय..बोगस लाभार्थ्यांना लाभ?

संत सेना महारांज्या नावर १४३ रचना
श्रीसकलसंतगाथेत (भाग १) सेना न्हावी यांच्या नावावर अभंग व गौळणी धरून १४३ रचना असून त्यांमध्ये गुरुविषयक उत्कट आदरभाव, नाममाहात्म्य, पांडुरंगाचा ध्यास तसेच त्र्यंबकमाहात्म्य, आळंदीमाहात्म्य आणि सासवडमाहात्म्य हे तीन स्थलमाहात्म्य सांगणारे अभंग आहेत. पंढरीचा पांडुरंग व ज्ञानदेव यांच्याबद्दलचा उत्कट जिव्हाळा त्यांच्या रचनेतून प्रत्ययास येतो. आपल्या व्यवसायातून रूपकनिर्मिती करून त्यांनी रचलेला ‘आम्ही वारिक वारिक करु हजामत बारिक बारिक । विवेकदर्पण दाऊ । वैराग्य चिमटा हालवू ।’ हा अभंग प्रसिद्ध आहे. त्यांनी रचलेल्या गौळणी भावोत्कट आहेत.


(टिप- या लेखात संत सेना महाराज चरित्र या पुस्तकातून व मराठी विश्वकोषातून काही संदर्भ घेतले आहे.)

loading image
go to top