
हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेत मागील वर्षी ट्रिगर (हवामानाचे धोके)मध्ये बदल करुन शेतकऱ्यांना नुकसान कारक करण्यात आले.
कापडणे : राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी कृषी भूषण अॅड् प्रकाश पाटील (पढावद,धुळे), नरेंद्र पाटील (लोणी, जळगाव), हेमंत देशमुख (वाशिम), उत्तमराव ठोंबरे (नाशिक), शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी कृष्णा पवार (औरंगाबाद), अनंता पाटील (हिंगोली), व श्रीकांत आखाडे (जालना) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातील शेती विंषयक विविध समस्या मांडल्यात. सोडविण्यासाठी आग्रह धरला. राज्यपाल कोश्यारी यांनी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ठोस भूमिकाही मांडली.
आवश्य वाचा- बटाटा शेती ठरतेय वरदान; खडकदेवळाच्या शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी ! -
शेतकर्यांना 24 तास वीज हवी
शेतकर्यांना कृषी पंपासाठी चोवीस तास वीज हवी. राज्यात सर्वांना चोवीस तास वीज दिली जाते. शेतीकरीता फक्त आठ तास आहे. तीही कमी दाबाने दिली जाते. कोरोना काळात विजेचा वापर अत्यंत कमी झाला. वीज शिल्लक असुनही शेतकऱ्यांना ज्यादा दिली गेली नाही.काही वेळी विज अतिरिक्त असल्यावर सुध्दा शेतकऱ्यांना पुर्ण वेळ वीज दिली जात नाही. शेतकरी पाणी व जमीन असल्यास एक विहीर ऐवजी दोन तिन विहीरी त्याच्या गरजेनुसार वापर करतो. त्याला पाहिजे असेल तेवढी विज वापरतो. जमीनीतुन पाण्याचा उपसा करतो. त्याचा खर्च वाढतो व देखभाल खर्च सुद्धा वाढतो. विजेचे जास्त कनेक्शन दिल्यामुळे शासन जे अनुदान देते. ते सुद्धा वाढते. शासनाचा खर्च वाढतो. आठ तास विज दिली जात असल्याने सर्व शेतकरी विहीरीवर आॅटो बसवुन एकाच वेळी पंप चालु करतात, त्यामुळे जनित्रावरचा भार वाढतो. ते बंद पडतात. विद्युत कंपनीचा खर्च वाढतो. शेती करीता स्वतंत्र फिडर करण्यामुळे सुध्दा कंपनीचा भरपुर खर्च झालेला आहे. चोवीस तास विज उपलब्ध करून दिली तर विजेचा वापर थोडाफार वाढेल. मात्र शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च व देखभाल खर्च कमी होईल. उत्पादन वाढेल. शासन विद्युत जोडणी वर जे अनुदान देते ते वाचेल.विज वितरण कंपनीचा विद्युत जनित्राचा देखभाल खर्च कमी होईल. शेतकरी त्याच्या सोयीनुसार विजेचा वापर करेल.यावर राज्यपाल कोश्यारी यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन वाढीसाठी विज उपलब्ध करून द्यावयास पाहिजे, असे सांगितले.
आवर्जून वाचा - टपरीवरचा कटींग असो की अमृततुल्यचा कप: 'चहाप्रेमी असाल तर वाचाच..चहाचे किती हे प्रकार
ट्रीगर शेतकर्यांना नुकसानकारक
हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेत मागील वर्षी ट्रिगर (हवामानाचे धोके)मध्ये बदल करुन शेतकऱ्यांना नुकसान कारक करण्यात आले. जे ट्रिगर कधी येऊच शकत नाहीत, असे ट्रिगर ठेवण्यात आले. हे ट्रिगर विशेषतः केळी व डाळींब फळपिकांचे जास्त नुकसान कारक आहेत. 2019 ला जे ट्रिगर होते. तेच पुढील वर्षी करीता ठेवावेत अशी मागणी केली. याबाबत कृषी मंत्री, मुख्यमंत्री यांनी आश्र्वासन दिले आहे. मात्र ट्रिगर ठरवितांना शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करतांना या बाबत नकार दिला जात आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे