राज्यात 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना करणार : मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

'स्टार्ट अप' उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु केले जात आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना दिले जाणारे विद्यावेतन 4 हजार रूपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. मानव विकास मिशनसाठी 350 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

मुंबई : स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी राज्य सरकारकडून 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच 'स्कील इंडिया'साठी 15 ते 25 वयोगटातील मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय पदवीधर तरूणांचे स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन केली जाणार आहेत. याचबरोबर राज्यात 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) दिली.

2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री मुनगंटीवार सादर करत आहेत. राज्यातील विविध विभागांच्या दृष्टीने महत्वपूर्ण तरतूदी केल्या जात आहेत. या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी तरतूद करण्यात आली आहे. ''यापूर्वी राजर्षि शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेची मर्यादा 6 लाख होती आता ही मर्यादा वाढविण्यात आली असून, नवी मर्यादा 8 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. तसेच 'स्टार्ट अप' उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु केले जात आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना दिले जाणारे विद्यावेतन 4 हजार रूपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. मानव विकास मिशनसाठी 350 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

तसेच 'स्कील इंडिया'साठी 15 ते 25 वयोगटातील मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय चक्रधर स्वामींच्या नावे अध्यासन केंद्राची स्थापना केली जाणार आहे. महापुरुषांचे साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी वेबसाईटचीही निर्मिती केली जाणार आहे. या योजनेसाठी ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Maharashtra News State Budget Education Funds Sudhir Mungantiwar