स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी 1316 कोटींची तरतूद : मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

समृद्धी महामार्ग-ग्रिनफिल्ड रेखेला मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख ९९ हजार किमी रस्ते बांधले गेले असून, पुढील टप्प्याच्या रस्ते बांधणी प्रकल्पासाठी 10, 828 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नाबार्डअंतर्गत रस्ते पूल बांधणीसाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची क्षमता वाढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.  

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यासाठी विकासकामे सुरु करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून 1316 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय नागरी पायाभूत सुविधांसाठी ९०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) दिली.

2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सादर केला. राज्यातील विविध विभागांच्या दृष्टीने महत्वपूर्ण तरतूदी जाहीर केल्या जात आहेत. ''रत्यांच्या दुपदरीकरणाचे 26 हजार कोटींचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. तसेच मुंबई मेट्रोच्या २६६ किमी लांबीचे प्रकल्पासाठी 130 लाखांची तरतूद केली आहे. मुंबई-नवी मुंबई या शहरांना जोडणाऱ्या ट्रान्सहार्बर रस्त्याचे काम सुरु झाले असून, नवी मुंबई, नागपूर, पुणे या शहरांतील मेट्रो प्रकल्पांसाठी 90 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

याशिवाय समृद्धी महामार्ग-ग्रिनफिल्ड रेखेला मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख ९९ हजार किमी रस्ते बांधले गेले असून, पुढील टप्प्याच्या रस्ते बांधणी प्रकल्पासाठी 10, 828 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नाबार्डअंतर्गत रस्ते पूल बांधणीसाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची क्षमता वाढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.  

याचबरोबर ७००० किमी रस्त्यांसाठी २२५५ कोटी ४० लाखांचा निधी दिला गेला आहे. नागरी पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारकडून ९०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. ट्रान्स हार्बर सागरी मार्ग उभारण्यासाठी 17 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Maharashtra News State Budget Smart City Funds Sudhir Mungantiwar