
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु आहे. मात्र काँग्रेसमध्ये काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं एक व्हॉट्सअॅप स्टेट्स चर्चेत आलं आहे. रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेट्समधील फोटोत त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केले होते तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसाला उपस्थित राहिले होते. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या मनात नेमकं काय चाललंय? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या, पण आता रविंद्र धंगेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.