

अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचाराचे आरोप केले असतानाच मनोज जरांगे पाटील यांनीही मुंडेंवर निशाणा साधला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी गोरगरीब लोकांचे दारिद्रय दूर करण्यासाठी जीवाचे रान केले अन् धनजंय मुंडे यांनी संपूर्ण समाज मातीत मिसळवला. पैशासाठी जातीवाद केला अन् स्वत:ला संपवून घेतले. पण आता त्यांची पापे झाकली जाणार नाहीत अशी टीका केली आहे. मनोज जरांगे यांनी भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींवरही हल्लाबोल केला आहे.