
आदित्य ठाकरेंनी निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आणि त्यापाठोपाठ एक नवी चर्चा सुरु झाली ती म्हणजे तेजस ठाकरेच्या राजकीय एंट्रीची. या चर्चेला निमित्त ठरलंय ते तेजसने वडिलांसह मंचावर लावलेल्या हजेरीचं. संगमनेरमधल्या सभेत मंचावर बड्या नेत्यांच्या गर्दीत, एका चेहऱ्यानं लक्ष वेधलं तो चेहरा होता तेजस ठाकरेंचा.
तेजस ठाकरे हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं ते मागच्या वर्षी. मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीवेळीही तेजस आदित्य ठाकरेंसोबत पोस्टरवर झळकला. तेव्हापासूनच युवासेनेची जबाबदारी तेजसकडे जाणार अशी चर्चा रंगतेय. आता तेजसचे थोरले बंधुराज आदित्य निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर तेजसही सक्रीय राजकारणात येण्याची शक्यताय.
तेजसचं नाव आजवर राजकारणा व्यतिरिक्त इतर आवडीनिवडींसाठीच चर्चेत राहिलं.
राजकारणात एंट्रीपूर्वी तेजसची ट्रेनिंग सुरु असल्याचं बोललं जातंय.. उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा याचेच संकेत देतेय. एकीकडे सेनेचं सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याच्या दिशेनं झेपावलंय. तर दुसरीकडे तेजस ठाकरेंच्या रुपाने शिवसेना सूर्ययान 2 प्रक्षेपित करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. आता हे सूर्यायान दोन कधी झेपावतं, याची प्रतीक्षा शिवसेनेसह अवघ्या महाराष्ट्राला आहे.
WebTitle : marathi news mumbai tejas thackeray may join active politics