

Latest Marathi Live Update News
esakal
राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याचे नूतनीकरण व दुरुस्ती दाखवून, कोट्यवधी रुपयांची खोटी बिले काढली असल्याचे चौकशी अहवालातून पुढे आले आहे. मात्र मागील चार महिन्यांपासून या अहवालावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.
राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यावर झालेल्या ३० कोटींच्या खर्चावर अनेक तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक येथील दक्षता व गुणनियंत्रण विभागाने या प्रकरणाची चौकशी करून विभागाकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालात मंत्र्याच्या बंगल्यावर स्टेशनरीचा खर्च, फर्निचर, नूतनीकरण व रंगकाम तसेच अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर आक्षेपार्ह खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.