ध्येयपूर्तीसाठी मार्गदर्शनाची गरज 

सुहास कोकाटे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

या गोष्टी विसरू नका

प्रशासकीय अधिकारी पदाचे ध्येय गाठण्यासाठी सहा गोष्टी महत्त्वाच्या, यामध्ये प्रशासकीय अधिकारी होण्यापासूनची असणारी मनापासून इच्छा तर असतेच, शिवाय योग्य मार्गदर्शन, संकल्प, निर्धार, समर्पण, शिस्त पाळण्याची तयारी, कालमर्यादा किंवा वेळेचे बंधन या सवयी ठेवल्या, तर पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरायला वेळ लागत नाही. 

फक्त इच्छाच नव्हे तर अगदी ध्येयप्राप्तीसाठी झपाटलेपण असायला हवे. मनामध्ये ज्वलंत इच्छा झाल्याशिवाय ती पूर्ण होण्यासाठी आपणाकडून प्रामाणिक प्रयत्न होत नाहीत. यासाठी योग्य मार्गदर्शन हा महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य मार्गदर्शनाअभावी क्षमता, सामर्थ्य, कौशल्य असूनही दिशा चुकल्यास केलेले सर्व प्रयत्न वाया जाऊन पदरी अपयश पडू शकते. योग्य वेळी सावध होऊन स्वतःची मते चुकत असल्यास त्यांचे मूल्यमापन करून योग्य मार्गदर्शन कसे मिळेल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अपयशानंतरही मी करतो आहे, तेच बरोबर ही भावना मनामध्ये असणे घातक आहे. आपण चुकीच्या मार्गावर आहोत हे समजून घ्यावे. अन्यथा फक्त वेळ व पैसा वाया जाईल व अपयश पदरी आल्याशिवाय राहणार नाही. 

योग्य मार्गदर्शन कसे असावे? 
अभ्यासक्रमामधील सर्व घटक समजावून घेणे, ही योग्य मार्गदर्शनाची पहिली पायरी आहे. अभ्यासक्रमावर विचारले जाणारे प्रश्‍न कोणत्या स्वरूपामध्ये आहेत, यावरून दिशा ठरवता येईल. अभ्यासक्रमाचे छोटे-छोटे टप्पे आखावेत व ते निश्‍चित कालावधी ठरवून पूर्ण करावेत. अभ्यासामध्ये संदिग्धता ठेवू नये. अभ्यासक्रमामधील सर्व शंका मार्गदर्शकाकडून समजावून घ्याव्यात. एखाद्या ठिकाणी पैसे भरून योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास वाया जाणारा वेळ व होणारा मनस्ताप वेगळाच असतो. 

योग्य मार्गदर्शन मिळविण्यासाठीचा उपाय! 
पदवीच्या पहिल्या वर्षापासून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर-1 व पेपर-2 मधील सर्व घटकांचा अभ्यासक्रम, याशिवाय PSI/STI/PSP.S.I/S.T.I/ASO पूर्वपरीक्षा पेपरमधील सर्व घटकांचा अभ्यासक्रम, कर सहायक, तलाठी, खात्याअंतर्गत फौजदार परीक्षा, लिपिक अशा विविध परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरामध्येच अथवा गावामध्येच योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी मेमरी कार्ड व पेनड्राइव्हच्या स्वरूपामध्येच तज्ज्ञांचे व्हिडिओ लेक्‍चर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना पुढील 18 महिन्यांसाठी अद्ययावत घटना तसेच प्रश्‍नपत्रिका सातत्याने व्हॉट्‌सऍप व ई-मेलवर पाठविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरामध्ये अथवा गावांमध्ये अभ्यास व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. या डिजिटल किटमध्ये प्रत्येक विषयामधील प्रत्येक घटक सखोल पद्धतीने समजावून सांगितला आहे. विद्यार्थ्यांचे हे साधन सातत्याने अद्ययावत करून मिळणार आहे. यामुळे वारंवार खर्च करण्याची आवश्‍यकता असणार नाही. लॅपटॉप अथवा संगणक असणाऱ्यांसाठी पेनड्राइव्ह असेल. ज्या विद्यार्थ्यांकडे यापैकी काहीही साधन उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी मोबाईलमध्ये वापरले जाणारे मेमरी कार्डही उपलब्ध करून दिलेले आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला याचा अभ्यास करता येणार आहे. हे साधन आपापल्या भागामधील "सकाळ' कार्यालयामध्ये उपलब्ध असून, सर्वांना या ठिकाणी आपला सेट मिळविता येईल. 

पुस्तक वाचन व डिजिटल किटमधील फरक 
मित्रांनो, अभ्यासाची सुरवात करताना सर्वांत प्रथम महत्त्वाचे मानले जाणारे योग्य मार्गदर्शन तुम्हाला या डिजिटल किटमधून मिळणार आहे. वेगवेगळी पुस्तके वाचून काढाव्या लागणाऱ्या नोट्‌ससाठी सातत्य लागते. नियमितपणे 10 पानांच्या नोट्‌स काढत असल्यास आपण अभ्यासाच्या योग्य ट्रॅकवर आहोत, असे समजावे. मात्र, प्रत्येक पुस्तकामधून तो विषय तसेच विषयामधील प्रत्येक घटक समजावून घेताना चित्त एकाग्र करणे, तसेच एका पुस्तकामधून तुमचा संपूर्ण अभ्यास होणार नाही, यासाठी आपणाला वेगवेगळी पुस्तके अभ्यासावी लागतील. यामध्ये दररोज कमालीचे सातत्य असणे आवश्‍यक असते. अन्यथा 15 दिवस नियमितपणे नोट्‌स काढल्या व पुन्हा महिनाभर सातत्य टिकविता आले नाही, तर अभ्यासाचा कालावधी वाढत जाईल, म्हणजे निश्‍चितच यशस्वी होण्याचा कालावधीही वाढत जाईल. मग हा कालावधी 5 वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंतचाही असू शकेल. याशिवाय वाढत्या वयाबरोबराबर येणाऱ्या नैराश्‍याचाही विचार करावा लागेल. यासाठी तुमच्यासमोर असे साधन असेल, की ज्या ठिकाणी महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या विषयांमधील स्पर्धा परीक्षेचा 10 ते 15 वर्षांचा अनुभव असणारे व ज्यांचे अनेक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी म्हणून केंद्र तसेच राज्य शासनामध्ये कार्यरत आहेत, असे दिग्गज अथवा तज्ज्ञ त्यांचा विषय तुम्हाला सोप्या भाषेमध्ये अगदी सखोलपणे सांगत आहेत. हे सर्व तुम्हाला हव्या त्या वेळी हव्या त्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत तर काय होईल? याशिवाय सर्व विषयांच्या 2 हजार 700 पानांच्या अगदी सखोलपणे तयार केलेल्या नोट्‌स तुमच्या समोर डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक विषय हव्या त्या वेळी समजावून घेता येतोय, अभ्यास करताना एखादी शंका तुम्हाला आल्यानंतर ही शंका संबंधित विषयाच्या तज्ज्ञाकडे तुम्हाला पाठविता येते. त्यावर संबंधित तज्ज्ञांकडून तुम्हाला 24 तासांच्या आत व्हॉट्‌सऍप व ई-मेलवर उत्तर मिळतेय. तुमच्याकडून परीक्षेच्या अगोदर एक महिना सरावासाठी प्रश्‍नपत्रिका सोडवून घेतल्या जात आहेत. तुम्ही कमी पडत असलेल्या ठिकाणी नेमके काय करणे अपेक्षित आहे, याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. अद्ययावत घटनांमधील जास्तीत जास्त प्रश्‍न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. असे योग्य मार्गदर्शन "सकाळ विद्या' व शिवनेरी फाउंडेशनमार्फत उपलब्ध करून दिले आहे. 

कोणतीही नवीन गोष्ट स्वीकारताना मनामध्ये शंका असतातच, त्या दूर करण्यासाठी व या अभ्यासक्रमाची गुणवत्ता तपासून पाहता यावी यासाठी यू-ट्यूबवर "शिवनेरी ऍकॅडमी' असा चॅनेल सर्च करून व्हिडिओवर क्‍लिक केल्यास सर्व विषयांचे एक एक प्रकरण गुणवत्ता तपासून पाहण्यासाठी ठेवले आहे. यानंतर निश्‍चिंतमनाने हे डिजिटल तंत्र आपण स्वीकाराल व आपणास योग्य मार्गदर्शन मिळेल, याबद्दल शंका नाही. यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण संकल्प, निर्धार, समर्पण, शिस्त पाळण्याची तयारी, कालमर्यादा किंवा वेळेचे बंधन याबद्दल समजावून घेऊयात. 

पुण्यात येत्या शनिवारी चर्चासत्र व मॉक टेस्ट 
"सकाळ विद्या' व शिवनेरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (ता. 10) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे एकदिवसीय चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे हे स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत हे चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रानंतर उमेदवारांची मॉक टेस्ट घेतली जाणार आहे. या ठिकाणी शिवनेरी फाउंडेशनने तयार केलेले स्पर्धा परीक्षेचे डिजिटल तंत्र पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. 

देशसेवेची संधी मिळणे आनंददायी 
मूळचा चेंबूरचा अमोद नागपुरे "एमपीएससी'त पहिल्याच प्रयत्नात पास झाला. "आयएएस' होण्यासाठीचे अमोदने ध्येय डोळ्यांसमोर ठेवले होते. "यूपीएसी'सारख्या कठीण परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणं महत्त्वाचं हाच सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवल्याचे त्याने सांगितले. आमोद म्हणाला, ""माझे आईवडील सरकारी सेवेत आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीबाबत सुरवातीपासून आकर्षण होतं. मोठ्या पातळ्यांवरील सरकारी सेवेत सहभाग घ्यायचा असेल तर "यूपीएससी'शिवाय पर्याय नाही, असे खूप अगोदरच समजले. मी दहावीत असतानाच "यूपीएससी' परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. परीक्षेची खरी सुरवात पदवीनंतर केली. एक वर्ष केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. महाविद्यालयीन जीवनापासून अतिरिक्त वाचन खूप वाढवले.

"यूपीएससी'ची परीक्षा सोप्पी नाही. या परीक्षेत उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थी आपले नशीब आजमावतात. त्यामुळे दडपण नक्कीच होते. पण मन खंबीर असल्यानं त्यावर मात करता आली. मला "आयएएस' व्हायचं होतं परंतु "आयपीएस'साठी निवड झाली. ती मी खेळाडूवृत्तीने घेतली. देशसेवेची संधी कमी वयात मिळणं ही महत्त्वाची बाब होती.'' "यूपीएससी'साठी कुटुंबीयांचा भक्कम आधार फार महत्त्वाचा असतो, असे स्पष्ट करत तो म्हणाला, ""आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला पालकांची खूप चांगली साथ लाभली. आपल्यांच्या साथीने जगातील कोणतीही स्पर्धा सहज जिंकता येते. आपलीच माणसं मनोबल वाढवण्यासाठी मदत करतात. 

सध्या मी श्रीनगर येथील हझमतगल येथे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. चार वर्षांत अनेक आव्हानांना सामोरे गेलो आहे. समाजातील प्रत्येक स्तरातील माणसाचा पोलिस दलाशी कधी ना कधी संबंध येतो. या प्रत्येक अन्यायग्रस्त माणसाला न्याय देताना कोणतीही कसून राहू नये याकरिता होणारी धडपड न व्यक्त करता येणार समाधान देते.'' 

या गोष्टी विसरू नका

आधीचे लेख आणि बातम्या :

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Shivneri Foundation Suhas Kokate Writes about teaching