ध्येयपूर्तीसाठी स्मार्ट वर्क...! 

सुहास कोकाटे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

या गोष्टी विसरू नका

विद्यार्थ्याने ध्येय निश्‍चित केल्यावर त्याला यशापर्यंतची वाट दाखविता येते. यासाठी स्मार्ट वर्क महत्त्वाचे आहे. यशापर्यंत कसे मार्गक्रमण करायचे, हे लक्षात घेतले पाहिजे. 

राज्यसेवा पूर्व परीक्षा आता जवळ येतेय, या परीक्षेसाठी एकीकडे मनावर येणारा ताण व दुसरीकडे खुणावणाऱ्या यशामुळे वाढलेला उत्साह अशा दुहेरी भूमिकेत तुम्ही असालच. वर्षभर घेतलेले परिश्रम सिद्ध करण्याची ही संधी तुम्हाला खुणावतेय. अशा वेळी परीक्षेत उत्तीर्णच नव्हे, तर चांगल्या पद्धतीने यशस्वी होण्यासाठी आवश्‍यक असणारी सर्व कौशल्ये पणाला लावण्याची आता आवश्‍यकता आहे. इतरांना मागे टाकून पुढे जाण्याची चढाओढ तर प्रत्येकालाच असते, त्यालाच आपण स्मार्ट वर्क म्हणू शकतो. अर्थात, ज्या ध्येयप्राप्तीसाठी धडपड सुरू आहे, ते कसे आणि कोणते असावे? त्यात यशस्वी होण्याचे निकष या सर्वांसाठी एक नेमकेपणाचे उत्तर शिवनेरी फाउंडेशनने दिले आहे. 

ध्येय निश्‍चित करा.. 
शिवनेरी फाउंडेशनने प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला हव्या असलेल्या पदाचा परिपूर्ण अभ्यास करता यावा, नेमक्‍या विषयाचा अभ्यास करता यावा, यासाठी सर्व विषयांचा सर्वंकष आढावा घेऊन "एमपीएससी'तील राज्यसेवा पूर्व, पीएसआय, एसटीआय, एएसओ पूर्व, तसेच कर सहायक, तलाठी, लिपिक, फौजदार पदाच्या खात्याअंतर्गत परीक्षा या सर्व वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची रचना अगदी मुठीत मावेल अशा स्वरूपात केलेली आहे. तुम्ही परीक्षेतील यशासाठी सूक्ष्म अभ्यास करणार आहात ना? मग अभ्यास तो सूक्ष्मत्वाकडून तुम्हाला विश्‍वव्यापी प्रेरित करून टाकणारा ठरेल, असाच समाविष्ट केलेला आहे. 

स्मार्ट वर्क 
विद्यार्थ्यांचे "स्मार्ट वर्क' यातून कसे होणार आहे, हे आपण समजावून घेऊ या. "स्मार्ट' या पाच अक्षरांचा मी लावलेला अर्थ म्हणजे हाताचा पंजा. पंजा झाकल्यानंतर त्यामध्ये मुठीची ताकद येते. त्याचप्रमाणे स्मार्ट वर्क असल्यास आपण इतरांच्या पुढे एक पाऊल असतो हे निश्‍चित. आपले ध्येय पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे हे असेल आणि त्यात अपेक्षेपेक्षा जागा कमी असतील, तर तुमचे स्मार्ट वर्क हवेच. शिवनेरी फाउंडेशनने अभ्यासक्रम निर्माण करताना यातील स्मार्टमधील "एस' या अक्षराकडे पाहताना अभ्यासक्रमातील नेमकेपणा दर्शविला जातो. ध्येयामधील नेमकेपणा साध्य करण्यासाठी अभ्यासामध्येही नेमकेपणा असायला हवा. आपल्याला नेमका काय अभ्यास करायचाय, यासाठी नेमकी कोणती साधनसामग्री आवश्‍यक आहे. याची स्पष्ट कल्पना विद्यार्थ्याला असणे आवश्‍यक आहे. यशस्वी होण्यासाठी कोणतीही संदिग्धता नसणे आवश्‍यक असते. यासाठी शिवनेरी फाउंडेशनने वेगवेगळ्या विषयांमधील अभ्यासक्रमाची रचना करताना अगदी सखोलपणे विद्यार्थ्याला प्रत्येक विषयामधील प्रत्येक घटकाची वेगवेगळ्या पुस्तकामधील अगदी सखोल माहिती व्हिडिओ लेक्‍चर्स व डिजिटल नोट्‌सच्या स्वरूपात दिलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामधील संदिग्धता कमी होऊन विद्यार्थ्याला नेमका अभ्यास करणे सहजपणे शक्‍य होणार आहे. निश्‍चित अभ्यासाची दिशा सापडली तर यशप्राप्तीचा मार्ग साध्य करता येईल व आपली पावले ध्येयप्रप्तीच्या दिशेने पडू लागतील. 

स्मार्टमध्ये दुसरे अक्षर "एम' म्हणजेच "मिजरेबल' असे आम्ही मानतो. थोडक्‍यात, ध्येयाचे मापन करणारा असा याचा अर्थ. ध्येयाचे मापन करताना तुम्हाला ध्येयाचे म्हणजेच अभ्यासाचे वेगवेगळे टप्पे आखता आले पाहिजेत. अभ्यासामध्ये नेमकेपणा असल्याशिवाय अभ्यासाचे मोजमाप करता येणे अशक्‍य आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल मला मेरिटमध्ये यायचे आहे; पण ध्येयामध्ये नेमकेपणा नसेल तर यशप्राप्ती होणे अवघड आहे. ध्येयाचे मापन करता येण्यासाठी योग्य अभ्यासक्रमाची रचना शिवनेरी फाउंडेशनने तयार केलेल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे, यावरून आपल्या लक्षात येईल, की माझा अभ्यास नेमका कितपत पूर्ण झालेला आहे. यामुळे ध्येयाच्या प्रवासात आपण नेमके कुठपर्यंत पोचलेलो आहोत व अजून किती अंतर कापायचे आहे हे लक्षात येईल. 

स्मार्टमधील मधील तिसरे "ए' हे अक्षर ऍचिव्हेबल म्हणजे ध्येयप्राप्तीसाठी सामान्य विद्यार्थ्यालाही समजेल व पुन्हा-पुन्हा अभ्यासक्रमाची उजळणी करता येईल अशा सोप्या पद्धतीने रचना केलेली आहे. अगदी मूलभूत संकल्पनांसह सर्व विषय समजावून सांगितले आहेत. याशिवाय अभ्यासक्रमाचे किट विकत घेणाऱ्या विद्यार्थ्याला पुढील दीड वर्ष अद्ययावत घटना व सरावासाठी विविध प्रश्‍नपत्रिका पुरविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्याने एखादा प्रश्‍न व्हॉटसऍप किंवा ई-मेलच्या माध्यमातून विचारल्यास त्याला 24 तासांच्या आत स्पष्टीकरणासह उत्तर पुरविले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्याची संपूर्ण तयारी त्याच्या गावामध्येच होणार असल्याने विद्यार्थ्यांना पदवीच्या पहिल्या वर्षापासून अभ्यास करणे सहज शक्‍य होणार आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेमधून प्रशासकीय अधिकारी होण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याजोगे असणार आहे हे नक्की. 

स्मार्टमधील चौथे "आर' हे अक्षर रिअलॅस्टिक म्हणजे या अभ्यासक्रमामुळे प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय वास्तवात आणणारे आहे. ध्येयनिश्‍चिती व ध्येयप्राप्तीसाठी आपल्याकडे अभ्यासक्रमाचे साहित्य कितपत योग्य किंवा अयोग्य आहे हे आपल्याला माहिती असणे आवश्‍यक असते. आपल्यामध्ये असणाऱ्या उणिवांची जाणीव असणे आवश्‍यक असते. स्वतःची मते कायम ठेवून अपेक्षाभंगाचे दुःख पदरी पाडून घेण्यात मुळीच शहाणपणा नसतो. 2 ते 3 वर्षे सातत्याने अपयश पदरी येत असेल तर निराशावाद वाढण्याचा धोका असतो. यामुळे आपण करत असलेला अभ्यास व व्हिडिओ लेक्‍चर्स तपासून पाहावीत. यासाठी आपण "यू ट्यूब'वर "शिवनेरी ऍकॅडमी' सर्च केल्यास त्यातील व्हिडिओ लेक्‍चर्स पाहिले तरी आपल्याला त्यातील सखोलता लक्षात येईल व अभ्यासाची दिशा स्पष्ट होईल. वरील सर्व परीक्षांचा सर्व अभ्यासक्रम पेनड्राइव्ह व मेमरी कार्डच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमामुळे प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय वास्तवात येणार आहे. यासाठी स्मार्टमधील "टी' म्हणजे टाइमबॉन्ड या अर्थाने वेळेत हा अभ्यास पूर्ण करता येईल. कमी वेळेत अभ्यास परिपूर्ण होईल व कालमर्यादेमुळे मनामध्ये एक सकारात्मक विचार निर्माण होईल. अशा प्रकारे संपूर्ण अभ्यासक्रमाची रचना शिवनेरी फाउंडेशनच्या अभ्यासक्रमात आहे, ती विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनीही तपासून पाहावी व खरेदी करावी. आज दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पालक हजारो रुपये खर्च करताना दिसतात, त्यामुळे आयुष्यामध्ये आपले प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वत:चे करिअर घडविण्यासाठी 10 ते 12 हजार रुपये जास्त नाहीत असे मला तरी वाटते. 

स्वयंअध्ययनातून अधिकारीपदाला गवसणी....! 
इंदापूर तालुक्‍यातील बोरी येथील महेश ज्ञानेश्वर लेंढे याने नुकतीच उत्पादन शुल्क निरीक्षकपदाला गवसणी घातली. अर्थात, तो यावर थांबलेला नाही. त्याच्या अजून तीन पदांच्या मुलाखती व्हायच्या आहेत. जिल्हाधिकारी व्हायचे या ध्येयाने त्याची वाटचाल सुरू आहे. मात्र, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक इच्छुकांना हुरूप देणारी ही घटना अशासाठी, की एका साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा असलेला महेश याने कोणतीही अतिरिक्त किंवा शहरांमधील शिकवणी लावलेली नव्हती. स्वयंअध्ययनातून त्याने ही कामगिरी केली. महेशने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर, त्याने पुढे काय करावे हा त्याचा प्रश्‍न त्याच्यावरच कुटुंबीयांनी सोपवला. मात्र, आपण प्रशासकीय सेवेतच जाणार असल्याचे महेशने वडील ज्ञानेश्वर यांना सांगितले आणि त्याने अभ्यासाला सुरवात केली. दोन-तीन वेळा यशाने हुलकावणीही दिली; परंतु खचून न जाता, तसेच शहरामध्ये न जाता त्याने घरी बसूनच अभ्यासाचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीही ठरवून दाखविला. महेश सांगतो, "मला अजून यशाचे शिखर गाठायचे आहे. मी थांबणार नाही. मात्र, ज्या पदाच्या माध्यमातून सामान्यांची सेवा करता येऊ शकेल, असे प्रशासकीय पद मिळविण्यासाठी मी अजूनही अशाच पद्धतीने अभ्यास करतोय. स्वतःचा अभ्यास मला वाटेल तिथे बसून करता यावा ही माझी धारणा असून, त्यात मी यशस्वीही झालो आहे. यापुढील अभ्यासाची पद्धतही हीच राहील. मला खात्री आहे, की येणाऱ्या काळात मी ध्येयप्राप्ती नक्कीच करेन.''

या गोष्टी विसरू नका

आधीचे लेख आणि बातम्या :

Web Title: Marathi News Shivneri Foundation Suhas Kokate writes Smart work