Vidhan Sabha 2019: राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे उलट दिशेला?

विशाल सवने, दिलीप कांबळे आणि भारत नागणे
Tuesday, 8 October 2019

  • राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे उलट दिशेला?
  • पाच मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची अडचण?
  • कार्यकर्त्यांच्या निर्णयावर उमेदवाराचं भवितव्य अवलंबून

जागावाटपात  झालेल्या घोळाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह त्यांच्या उमेदवारांनाही बसलाय. या घोळामुळे पाच ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं भवितव्यच अडचणीत आलंय.

  • पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांच्याकडे पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नसल्यानं त्यांचा अर्ज छाननीत बाद ठरलाय. त्यामुळे चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यायची वेळ राष्ट्रवादीवर आलीय
  • भोसरीत राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एका स्थानिक नगरसेवकानंही अर्ज दाखल केला. मात्र, अखेर या नगरसेवकाला माघार घ्यायला लावून विलास लांडेंना पुरस्कृत म्हणून राष्ट्रवादीनं जाहीर केलीय.
  • करमाळा मतदारसंघात तर राष्ट्रवादीनं संजय पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यानंतर त्यांना मतदान न करता, अपक्ष उमेदवार संजय शिंदेंना मतदान करा, असं आवाहन अजित पवारांनी मतदारांना केलं.
  • सांगोला मतदारसंघ आघाडीच्या जागावाटपात शेकापकडे गेला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखेंनी नाराज होत अर्ज भरला. त्यामुळे इथंही राष्ट्रवादीला नको तर शेकापला मतदान करा, असं आवाहन करावं लागलं.
  • पंढरपूरमध्ये काँग्रेसमधून आलेल्या भारत भालकेंना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिलीय. त्यामुळे तिथं चिडलेल्या काँग्रेसनं आपलाही उमेदवार रिंगणात उतरवलाय

राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलेला हा घोळ मतदारांनाही संभ्रमित करू शकतो. त्याचा परिणाम राष्ट्रवादीला भोगावा लागेल, अशीच भीती व्यक्त केली जातेय.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

WebTitle : marathi news vidhansabha election 2019 NCP and NCP candidate may face problem

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vidhansabha election 2019 NCP and NCP candidate may face problem