
नागपूरः महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रकाशित संदर्भ ग्रंथ मराठी विश्वकोशातून ‘गांधीवध’ हा शब्द बदलण्यात आला असून, त्याऐवजी ‘गांधीजींचा खून’ असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गोडसेचा आदरार्थी उल्लेख वगळून ‘नथुराम गोडसे हा माणूस संघात होता’ असा बदल करण्यात आला आहे. मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, हे बदल विश्वकोशाच्या ताज्या डिजिटल आवृत्तीत नमूद आहेत. हेच बदल मुद्रित आवृत्तीतही असतील, अशी माहिती त्यांनी दिली.