

Supriya Sule
sakal
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीची हानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत केली. तसेच, सरकारचे प्राधान्य कर्जमाफीला नव्हे तर निवडणूक प्रचाराला असल्याचाही टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.