Keshavrao Dhondge: शेकापच्या केशवराव धोंडगे यांचं निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Keshavrao Dhondge

Keshavrao Dhondge: शेकापच्या केशवराव धोंडगे यांचं निधन

मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांचे निधन झाले. वयाच्या 102 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. (Marathwada Keshavrao Dhondge of Sheep passed away)

केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधिमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी लोकांचं प्रतिनिधित्व केलं. विधानसभेतील त्यांची अनेक भाषणं प्रचंड गाजली. जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा नेता अशी त्यांची ख्याती होती.

केशवराव धोंडगे हे पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची ओळख होती.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा गावातून केशवराव धोंडगे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत स्वत:ला जोडून घेतले. त्यांची साम्यवाद, मार्क्सवाद अशा दोन्ही विषयांवर अढळ निष्ठा होती. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोटतीडकिने विधिमंडळ आणि संसदेत मांडले.