
Marathwada Flood: मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. अनेक भागांमध्ये दहा फुटांपर्यंत खाली शेती वाहून गेलीय. पुरामुळे कित्येक घरामध्ये पाणी शिरलं आणि संसार उघड्यावर पडला. एवढंच नाही तर शेकडो जनावरं दगावली आहेत. सरकारने अतिवृष्टीबाधितांसाठी आणि पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे.