
जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गुरुवारी एक जवान शहीद झाला. शहीद जवान महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा आहे. संदीप पांडुरग गायकर असं जवानाचं नाव असून ते अकोले तालुक्यातल्या ब्राह्मणवाडा गावचे होते. संदीप गायकर हे सात वर्षांपूर्वी लष्करात भरती झाले होते.