मसालाकिंग डॉ. धनंजय दातारांच्या मदतीमुळे दुबईतील मराठी कामगार परतले

विवेक मेतकर
Monday, 20 July 2020

कोविड विषाणूमुळे झालेल्या लॉकडाउनमुळे दुबईत अडकून पडलेल्या गरीब मराठी कामगारांना मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. रोजगार गमावल्याने निर्धन झालेल्या 186 महाराष्ट्रीय कामगारांची पहिली तुकडी नुकतीच दुबईतून चार्टर्ड फ्लाईटने मुंबईत परतली आहे. त्यांचा परतीच्या प्रवासाचा सर्व खर्च डॉ. दातार यांच्या अल अदिल ट्रेडिंग कंपनीने उचलला आहे.

अकोला ः कोविड विषाणूमुळे झालेल्या लॉकडाउनमुळे दुबईत अडकून पडलेल्या गरीब मराठी कामगारांना मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. रोजगार गमावल्याने निर्धन झालेल्या 186 महाराष्ट्रीय कामगारांची पहिली तुकडी नुकतीच दुबईतून चार्टर्ड फ्लाईटने मुंबईत परतली आहे. त्यांचा परतीच्या प्रवासाचा सर्व खर्च डॉ. दातार यांच्या अल अदिल ट्रेडिंग कंपनीने उचलला आहे.

महाराष्ट्रातून रोजगार, शिक्षण, पर्यटन यासाठी गेलेले जवळपास 65 हजार लोक दुबईत अडकून पडले आहेत. त्यामध्ये रोजगारवंचित झालेल्या व पैशाअभावी निवारा गमावलेल्या कामगारांची संख्याही मोठी आहे. अल अदील कंपनीने सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून अशा गरजू भारतीयांना स्वखर्चाने मायदेशी पोचवण्याची मोहीम हाती घेतली. याआधी लॉकडाऊनच्या काळात आम्ही हजारो कुटूंबांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, औषधे व जंतुनाशकांचे संच मोफत पुरवले होते.

संकटग्रस्त भारतीयांची घरी लवकर परतण्याची ओढ लक्षात घेऊन आम्ही निर्धन कामगारांचा विमान तिकीटाचा, तसेच वैद्यकीय चाचणीचा खर्च उचलण्याचे ठरवले. केरळ, तमीळनाडू, पंजाब, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील हून अधिक गरजू बांधवांना आम्ही भारतात घरी सुखरुप पोचण्यासाठी मदत केली. त्यासाठी कोटी रुपयांहून अधिक खर्च आला. प्रवास व वैद्यकीय खर्चाबरोबरच प्रवाशांच्या होम क्वारंटाइनची जबाबदारीही उचलायची होती. अल अदील कंपनीच्या वतीने संचालक वंदना दातार, हृषिकेश दातार व रोहित दातार यांनी आणि प्रवाशांच्या प्रतिनिधी म्हणून पुण्याच्या धनश्री पाटील यांनी समन्वयाचे, प्रवासी निवडीचे काम केले. परवानेविषयक औपचारिकता पूर्ण करण्यात राहुल तीळपुळे व अकबर अली ट्रॅव्हल्सचे सुलेमान यांची मदत झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Masalaking Dr. Dhananjay Datar helps to poor laborers for return to india