
Gadchiroli Leads Anti-Naxal Fight 61 Cadres Surrender Before CM in Grand Ceremony
Sakal
गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून मावोवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल वरीष्ठांसह एकूण ६१ सदस्यांनी सशस्र शरणागतीप पत्करली. ही माओवादाच्या हिंसापर्वाच्या समाप्तीची सुरुवात असून माओवाद १०० टक्के हद्दपार होणार आहे, अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार (ता १५) दिली. या लढाईचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा करत आहे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचेही ते म्हणाले.