Sun, March 26, 2023

Ahmednagar : गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Published on : 25 February 2023, 2:46 pm
नगर - नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गंगामाई कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. इथेनॉलच्या टाकीला आग लागल्याने ही स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
या स्फोटात अनेकजणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. इथेनॉलच्या प्लांटला आग लागल्यानंतर बॉयलरला देखील आग लागली. येथे असलेल्या रसाच्या टाक्या देखील फुटल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान कारखान्यात जेकाही मनुष्यबळ काम करत होतं, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता आहे. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून त्या कमी पडत असल्याचं समजतं. इथेनॉल निर्मितीच्या ठिकाणी स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.