Nanaryan Rane : माझ्या नादी लागू नका नाहीतर, पुण्यात येऊन बारा वाजवेन; राणेंचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane-Ajit Pawar

Nanaryan Rane : माझ्या नादी लागू नका नाहीतर, पुण्यात येऊन बारा वाजवेन; राणेंचा इशारा

Nanaryan Rane : अजित पवारांवर नारायण राणेंनी पलटवार केला आहे. शिवसेना फोडणाऱ्यांचा पराभव झाला असा निशाणा अजित पवारांनी राणेंवर साधला होता. त्याला आज राणेंनी जोरदार पलटवार केला आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवारांना बारामती बाहेरचं किती कळतं असा प्रश्न राणेंनी उपस्थित करत माझ्या नादी लागू नका नाही तर, पुण्यात येऊन बारा वाजवेल असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे.

राणे म्हणाले की, अजित पवारांना बारामती बाहेरचं राजकारण किती कळत याची मला कल्पना नाही. उगाच माझ्या नादी लागू नका नाहीतर, पुण्यात येऊन बारा वाजवीन असा इशारा राणेंनी अजित पवारांना दिला आहे.

राणे पुढे बोलताना म्हणाले की, बारामतीच्या बाहेर जाऊन बारसे घालायचे बंद करा. ज्या प्रकारचा राजकारणी आहे त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहावेळा निवडून आल्याचे सांगत महिला असेल, पुरुष असेल उमेदवार हा उमेदवार असतो असे राणे म्हणाले.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहिलं आहे? असा प्रश्न करत त्यांच्याकडे कुठलंही अस्तित्व नाही, काही नाही अशी खोचक टीका केली आहे. तसेच त्यांच्या उर्वरित १५ आमदार तरी शिल्लक राहतील की नाही हे सांगता येत नाही. काही बोलण्यापूर्वी आपण सत्तेत असताना काय केले हे पहा असा सल्लादेखील राणेंनी ठाकरेंना दिला आहे.

यावेळी त्यांना नामांतराचं श्रेय घ्यायला सगळेच येतील असे म्हणत मराठी भाषेतील विशेषणं कुठेही वापराता असा टोलादेखील लगावला. जे काम करतात त्यांचा पक्ष टिकतो. त्यामुळे कोणता पक्ष संपेल हे सांगालया मी काही ज्योतिषी नसल्याचे ते म्हणाले.