

Mini Matheran
ESakal
कर्जत : कर्जत आणि खालापूर तालुक्यांच्या सीमेवरील गारबट परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकासकामांमुळे या भागाच्या पर्यटन आणि ग्रामविकासाला नवी चालना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानच्या पायथ्याशी वसलेले गारबट गाव आता ‘मिनी माथेरान’ म्हणून विकसित होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे.