यंदा पुणे जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्वाधिक पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडलेला पुणे हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. पुण्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्या खालोखाल ५४ टक्के पावसाची नोंद ठाणे जिल्ह्यात झाली आहे.

पुणे - यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडलेला पुणे हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. पुण्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्या खालोखाल ५४ टक्के पावसाची नोंद ठाणे जिल्ह्यात झाली आहे.  

गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक पावसाची नोंद पुण्यात झाली आहे. १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत ५७४.८ मिलिमीटर पाऊस पडला. या दरम्यान ३२१.७ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. सरासरीपेक्षा २५३.१ मिलिमीटर जास्त पावसाची नोंद पुण्यात झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या जिल्ह्याला ‘मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झालेला जिल्हा’ असे हवामान खात्यातर्फे म्हटले जाते. 

सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेले जिल्हे (२० ते ५९ टक्के) - ठाणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, नाशिक आणि नगर

सरासरी गाठलेले जिल्हे (-१९ ते १९ टक्के) - सिंधुदुर्ग, सांगली, नंदूरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली

सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेले जिल्हे (-२० ते -५९ टक्के) - सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, भंडारदरा, गोंदिया


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maximum Rain in Pune District