Maharashtra Budget 2023: अर्थमंत्र्याची मोठी घोषणा! महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील उपचार मर्यादा पाच लाखांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget 2023

Maharashtra Budget 2023: अर्थमंत्र्याची मोठी घोषणा! महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील उपचार मर्यादा पाच लाखांवर

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. आरोग्य विभागासाठी 3 हजार 520 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून पाच लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली.

तर आपला दवाखाना उपक्रम आपण सुरू केला त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला, तो पाहता आता संपूर्ण राज्यामध्ये हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे 700 आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून, त्याद्वारे मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क आरोग्य सुविधांचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळत होता मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने यांची रक्कम वाढवून ती ५ लाख येवढी वाढवली आहे. तर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 4 लाख रुपयां पर्यंत वाढवली आहे. तर राज्यभरात नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार आहे.

महिलांच्या आरोग्यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत चार कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील. राज्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.