
Mayuri Bangar: मागील काही दिवसांपासून राजकारणात उठबस वाढलेल्या मयुरी बांगर या नेमक्या कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यातच त्यांची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालीय. संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याशी त्या फोनवर बोलत आहेत. त्यांच्यातला हा संवाद कौटुंबिक पातळीवरचा असला तरी मयुरी पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत.