
भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५: राज्यातील वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेदिक महाविद्यालये लवकरच पूर्णपणे डिजिटल होतील. ऑक्टोबर महिन्यात सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये एचएमआयएस म्हणजेच आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली लागू केली जाईल. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे डॉक्टर आणि रुग्ण दोघांचाही वेळ वाचेल आणि रुग्णाची नोंदणी झाल्यानंतर, पुढील भेटीत फक्त एका क्लिकवर रुग्णाचा संपूर्ण इतिहास संगणकावर उपलब्ध होईल.