वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणारच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amit deshmukh

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणारच

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

पुणे- कोरोनाच्या परिस्थितीत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा (Medical course exams) रद्द करा अशी मागणी होत असली तरी, ही शक्यता मावळली आहे. परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमानुसार योग्य ठरणार नसल्याने संयुक्तिक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून १० जूनपासून परीक्षा होतील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (amit deshmukh) यांनी स्पष्ट केले आहे. (Medical course exams will be held said amit deshmukh)

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १ जूनपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने २ जून पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. पण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या परीक्षा रद्द करा अशी मागणी केली जात होती. पण परीक्षा रद्द करणे शक्य नसल्याने या परीक्षा १० जून पासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशमुख यांनी याबाबत ट्विट करून भूमिका स्पष्ट केली. न्यायालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन घ्या किंवा रद्द करा याबाबत काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात लेखी पद्धतीने घेता येणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी याची परीक्षेस सामोरे जावे असे आवाहन देशमुख यांनी केले आहे

loading image
go to top