
meenatai thackeray
esakal
मुंबई, 17 सप्टेंबर 2025: मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याची घटना घडल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने तीव्र निषेध व्यक्त केला असून, पुतळ्याची तात्काळ साफसफाई केली. शिवसेनेचे नेते अनील देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला असून, तपास सुरू आहे.