ST Strike : सिल्व्हर ओकची रेकी ते नागपूरमधून फोन; वाचा कोर्टातील युक्तीवाद

Gunratna Sadavarte News
Gunratna Sadavarte NewsSakal Digital

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना शुक्रवारी राहत्या घरातून गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. त्यांनतर त्यांना किल्ला कोर्टाने (Killa Court) दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याचा कालावधी आज संपत असून, सदावर्ते यांना पोलिसांनी गिरगाव न्यायालयात (Girgaon Court) हजर केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील युक्तीवाद पूर्ण झाला असून, न्यायालयाने सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Meeting Was Held Before Silver Oak Attack )

Gunratna Sadavarte News
मोठी बातमी! सदावर्तेंना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान, युक्तीवादामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला. सरकारी वकील प्रदीप घरत (Pradip Gharat) यांनी सरकारीपक्षातर्फे युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी सदावर्ते यांना 11 दिवसांच्या पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने सदावर्तेंना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सिल्व्हर ओक (Silver Oak) हल्ल्याआधी एक बैठक झाली होती आणि नागपूरमधून आलेल्या कॉलबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.

Gunratna Sadavarte News
सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, मुलाचा फैसला उद्या

युक्तीवादादरम्यान, सरकारी वकील घरत यांनी न्यायालयाला सांगितले की, एका मराठी न्यूज चॅनलचा चंद्रकांत सुर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्ते यांच्या संपर्कात होता. तसेच या दोघांमध्ये सकाळपासून व्हॉट्सअपवर चॅटिंग तसेच व्हॉट्सअप कॉलदेखील झाल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, आंदोलनापूर्वी नागपूर येथून एक फोन आला होता असा धक्कादायक खुलासादेखील सरकारी वकील घरत यांनी केला. मात्र, आता आम्ही न्यायालयात त्या व्यक्तीचे नाव सांगू शकत नसल्याचे सांगितले आहे.

घटनेच्या दिवशी सकाळी साधारण साडेअकरापासून नागपूरमधून व्हॉट्स अप कॉल झाले होते. एवढेच नव्हे तर, नागपूरमधील फोननंतर पत्रकार पाठवा अशा आशयाचे संदेशदेखील करण्यात आल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. त्यामुळे हा सर्व सुनियोजित कट असल्याचा युक्तीवाद घरत यांनी केला आहे.

Gunratna Sadavarte News
मोठी बातमी : शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान; बिनविरोध निवड

या व्यक्तींनी केली होती सिल्व्हर ओकची रेकी

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक घरावर करण्यात आलेल्या आंदोलनापूर्वी रेकी करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी अभिषेक पाटील, कृष्णा कोरे, मोहम्मद ताजुद्दीन, सविता पवार यांना अटक केली आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. याशिवाय या सर्व घटनेत 1 कोटी 80 लाख रुपये कोणी आणि कसे गोळा केले. त्याशिवाय ते पैसे कोणी कोणी वापरले याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com