"आमच्या देवळातील देवच निघून गेला"

"आमच्या देवळातील देवच निघून गेला"
Updated on

सांगोला (सोलापूर): 'अहो आमच्या या देवळातून देवच निघून गेला, आता आम्ही कोणाला भेटायचं, आबासाहेब तुम्ही आमच्यासाठी परत या..! अशी आर्त हाक आबासाहेबांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यावर अनेक महिलांनी अक्षरशः हंबरडा फोडून केला. यामुळे उपस्थित सर्वच नागरिकांसह नेतेमंडळीही भावूक झाले होते.

"आमच्या देवळातील देवच निघून गेला"
राजकारणाचे विद्यापीठ 'गणपतराव देशमुख' यांचे निधन; पाहा व्हिडिओ

जेष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे पार्थिव सांगोल्यात आल्यानंतर सांगोला बाजार समितीच्या आवारा पासून त्यांच्या निवासस्थानापर्यंत शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानाजवळ आली असता पार्थिव गाडीतून उतरण्या अगोदरच अनेक महिलांनी अक्षरशः हंबरडा फोडला. 'आबासाहेब तुम्ही कुठे निघून गेलात, आमच्या देवळातील देवच निघून गेल्याने आता आम्ही कोणाला भेटायचं, आबासाहेब आमच्यासाठी तरी तुम्ही परत या..! अशी विनवणी महिला करीत होत्या.

"आमच्या देवळातील देवच निघून गेला"
तब्बल ११ वेळा आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचं निधन

महिलांच्या रडण्याने सर्वजण भावुक झाले होते. अंत्ययात्रेसाठी दर्शनासाठी आलेले नागरिक, अनेक नेतेमंडळी, शासकीय आधिकारी यांचेही डोळे पाणावले. या अंत्ययात्रेदरम्यान झालेली गर्दी व सामान्यांच्या डोळ्यात आलेले त्यांच्याविषयी अश्रू यामुळे आबासाहेब व सर्वसामान्य नागरिकांमधील नाते किती दृढ होते हेच दिसून आले. आमच्यातील आमचा देवच निघून गेला अशी भावना सामान्यजनांची झाली होती.

"आमच्या देवळातील देवच निघून गेला"
'विधानसभेचं विद्यापीठ' म्हणवले जाणारे गणपतराव देशमुख कोण होते?

आबासाहेबांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी येताच त्यांची पत्नी रतनबाई याही मोठ्याने रडू लागल्या. यावेळी आबासाहेबांचे नातू डॉ. बाबासाहेब व डॉ. अनिकेत हे त्यांच्या पायाजवळ बसून पाणवलेल्या डोळ्यांनींं त्यांना आधार देत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur
Sangola Milk Adulteration Case: FDA Destroys 37,532 Litres of Suspected Adulterated Milk
Solapur
Gajanan Maharaj Palkhi route change Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com