'फ्री काश्मीर'चे पोस्टर घेऊन थांबलेल्या 'त्या' मुलीनेच सांगितले....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

रविवारी रात्रीपासून गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेर आज (मंगळवार) आझाद मैदानात हलविण्यात आले आहे. सोमवारी रात्री याठिकाणी मोठे आंदोलन करण्यात आले.

मुंबई : दिल्लीतील 'जेएनयू'मध्ये हल्ल्याप्रकरणी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुरु असलेल्या आंदोलनात 'फ्री काश्मीर'चे पोस्टर झळकल्याने वाद सुरु झाले आहेत. अखेर यावर हे पोस्टर हातात घेऊन थांबलेल्या मेहक या विद्यार्थीनेने खुलासा केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारी रात्रीपासून गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेर आज (मंगळवार) आझाद मैदानात हलविण्यात आले आहे. सोमवारी रात्री याठिकाणी मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच याठिकाणी झळकाविलेल्या पोस्टरवरून वाद सुरु झाले आहेत. या आंदोलनात मेहक नावाची तरुणी हातात फ्री काश्मीर असे पोस्टर दिसले होते. यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. 

JNU attack : उद्धवजी काश्मीर मुक्तच्या घोषणा आपण मुंबईत सहन करणार का? : फडणवीस (व्हिडिओ)

'ईटीव्ही भारत' या वाहिनीशी बोलताना मुंबईची रहिवासी असलेली मेहक म्हणाली, की काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्यासाठी नव्हे, तर तेथील नागरिकांनाही इतर भारतीयांप्रमाणेच स्वातंत्र्य मिळावे म्हणून हा फलक झळकावले. काश्मीरमधून मानवता कुठे तरी हरवली आहे. आपण इथे राहून त्या ठिकाणच्या अडचणी समजू शकत नाही. जसे आपण स्वतंत्र आहोत त्या प्रमाणे काश्मीर मधील लोकांनाही स्वतंत्रता मिळाली पाहिजे. मी काश्मिरी नाही मुंबईमधून आहे. तरीही हे बोलत आहे. काश्मिरी जनतेच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. गेले दीडशे दिवस त्याठिकाणचे सर्व व्यवहार बंद पडले आहेत. आपण असे राहू शकत नाही. आपल्या लढाईत काश्मिरी नागरिकांना सोबत ठेवून त्यांच्या स्वातंत्र्य मिळावी इतकीच माझी मागणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mehak shown free kashmir poster in student protest on gate way of india