बंदी घातलेल्या ‘सिमी’ संघटनेचे सदस्य सोलापुरात? सोलापूर शहर पोलिसांनी काढली कुंडली; ‘अल कायदा’शी संबंधित जुबेर हंगरेकरचा शहरातील नियोजित कार्यक्रम घेतला ग्रामीणच्या हद्दीत

‘अल कायदा’ दहशतवादी संघटनेशी संबंधित जुबेर हंगरेकर यास एका संघटनेने सोलापुरात बोलावून तरुण मुलांसाठी कार्यक्रम ठेवला होता. पण, जेलरोड पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे ठिकाण बदलले आणि कुंभारीजवळील एका शाळेत तो कार्यक्रम घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ATS action

ATS action

solapur sakal

Updated on

सोलापूर : ‘अल कायदा’ दहशतवादी संघटनेशी संबंधित जुबेर हंगरेकर यास एका संघटनेने सोलापुरात बोलावून तरुण मुलांसाठी कार्यक्रम ठेवला होता. पण, जेलरोड पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे ठिकाण बदलले आणि कुंभारीजवळील एका शाळेत तो कार्यक्रम घेतल्याची माहिती समोर आली आहे. कार्यक्रम घेणाऱ्या संघटनेत ‘सिमी’चे काही सदस्य असल्याचा संशय पोलिसांना आहे.

सोलापुरातून सहा-सात वर्षांपूर्वी पुण्यात गेलेला जुबेर अभ्यासात खूप हुशार होता. तो आयटी इंजिनिअर झाला आणि त्याला कंपनीत वार्षिक २३ ते २५ लाख रुपयांचे पॅकेज होते. तो मूळचा सोलापूर शहरातील असल्याने त्याचे मित्र, ओळखीचे खूपजण शहरात आहेत. तो ‘एटीएस’च्या (दहशतवादविरोधी पथक) कोठडीत आहे. त्याच्या संपर्कात सोलापूर शहरातील काहीजण सतत होते. त्याला सोलापुरात कार्यक्रमासाठी ज्या संघटनेने बोलावले होते, त्यातील एक पदाधिकारी जुबेरसोबत चेन्नईतील कार्यक्रमाला देखील जाऊन आलेला होता.

सोलापूर शहरात, राज्यात, देशभरात शांतता, बंधुभाव टिकून राहावा, यासाठी शहर पोलिसांनी ‘सिमी’ या बंदी घातलेल्या संघटनेचे आजही सदस्य असलेल्या त्या संशयितांवर पोलिसांचा वॉच आहे. त्यांची कुंडली (डोजिआर) पोलिसांनी काढली असून त्यांच्या प्रत्येक हालचालींवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे दोन धर्मात तेढ निर्माण होण्याच्या हेतूने धार्मिक भावना दुखावतील, असे कृत्य करणाऱ्यांवरही शहर पोलिसांनी लक्ष ठेवत त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.

सिमी संघटनेबद्दल थोडक्यात...

‘सिमी’ ही स्टुडंटस इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया या संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. १९७७ मध्ये तिची स्थापन झाली. या संघटनेवर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे आणि देशातील शांतता व सलोखा बिघडवल्याचा आरोप आहे. त्यामुळे भारत सरकारने या संघटनेवर ३१ जानेवारी २०१९ रोजी बंदी घातली असून, ती भारतासाठी धोकादायक मानली जाते. बंदीनंतर संघटनेतील त्यावेळचे अनेक सदस्य ‘वहादते मुस्लिम- ए- हिंद’ या संघटनेत कार्यरत असल्याचे बोलले जाते.

शांततेसाठी पोलिस नेहमीच सतर्क

सोलापूर शहराच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी आरोपींवर नेहमीच कठोर कारवाई केली आहे. हिंदू-मुस्लिम भांडणातील आरोपींकडून ५० हजार ते एक लाख रुपयांचे बॉण्ड घेतले जातात. त्याने गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवल्यास त्याच्याकडून दंड वसूल केला जातो, नाहीतर तुरुंगात पाठविले जाते. याशिवाय अशा गुन्ह्यातील अनेकांवर तडीपार, स्थानबद्धतेची व संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोका) देखील कारवाई केली आहे.

- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com