esakal | आरोग्याच्या दुर्लक्षातूनच वाढले मानसिक आजार
sakal

बोलून बातमी शोधा

Mental Health

आरोग्याच्या दुर्लक्षातूनच वाढले मानसिक आजार

sakal_logo
By
अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोविड-१९ चा सर्वाधिक प्रभाव हा मानसिक आजारावर पडलेला आहे, असे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले. दोन वर्षे कोविडमुळे रोजगारात घट, शाळा बंद, लॉकडाउन, जुनाट आजारांवर वेळीच उपचार न होणे आदीमुळे सर्वाधिक मनोविकारांचे प्रमाण सर्व वयोगटात वाढले आहे. यात शासकीय रुग्णालयांबरोबर खासगी रुग्णालयात असे रुग्ण कौन्सिलिंग, औषधोपचार घेतात; मात्र वाढत्या महागाईच्या काळात उपचारही महागले. याचा खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. परिणामी, बहुतांश रुग्ण उपचाराविनाच राहत असून, यातूनच शारीरिक आजारांबरोबर मानसिक आजारही जडत आहेत.

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा होत असतो. यावर्षीची आरोग्य दिनाची संकल्पना ही ‘असमान जगात मानसिक आरोग्य’ अशी आहे. मानसिक आरोग्य हे सार्वजनिक आरोग्याच्या दुर्लक्षित क्षेत्रांपैकी एक आहे. आपल्यापैकी ४ पैकी १ प्रत्येकवर्षी मानसिक आरोग्याची समस्या अनुभवेल. आता ही असमानता दूर करण्याची गरज आहे. मानसिक आरोग्य समजून घेणे, जागरुकता वाढविणे, सामाजिक कलंक दूर करणे, हे ध्येय आहे. वेगवेगळ्या माध्यमांमुळे लोक पुढे येऊन त्यांना कुठल्या मानसिक आजाराने ग्रासले आहे, याबाबत चर्चा करत आहेत.

हेही वाचा: सामान्यांच्या ताटातून भाजी गायब

कोणते आजार जडतात?

नैराश्य, ऑटिझम, डायमेंशिया, बायोफ्लोर, डिप्रेशन, न्यूरोटिक, स्क्रिझोफेनिया, उदासीनता, डिप्रेशन, व्यसनाधीनता, व्यक्तिमत्त्व विकृती असे काही प्रकार आहेत.

मानसिक आजार कशामळे होतो?

 • मानसिक आघात, पालकांचे लवकर नुकसान आणि दुर्लक्ष

 • मेंदूतील न्युरोट्रान्समीटरची पातळी कमी-जास्त होते.

 • अनुवंशिकता, पर्यावरणीय आणि सामाजिक आहेत.

कसे कळेल?

 • व्यक्तिमत्त्व बदल, विचित्र किंवा कल्पना

 • जास्त चिंता, दीर्घकाळ उदासीनता, संशय, भास, भ्रम

 • कमी झोप, भूक विस्कळीत होणे

 • आत्महत्येबद्दल विचार करणे

 • दारू किंवा ड्रग्जचा गैरवापर, जास्त राग, हिंसक वर्तन

 • दैनंदीन कामाचा सामना करण्यास असर्मथता

कोल्हापुरात कुठे व्यवस्था आहे?

 • सेवा रुग्णालय कसबा बावडा येथे मानसोपचार विभाग सुरू

 • जिल्ह्यातील सर्व ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालये

 • १२ तालुक्यांतील आरोग्य केंद्रात आठवड्यातून एक दिवस मानसोपचार बाह्यरुग्ण तपासणी

 • अधिक माहितीसाठी शासनाच्या १०४ हेल्पलाईनवर कॉल करा


मदत कशी करता येईल?

 • आधार देणे, मानसिक आजाराबद्दल खुली, प्रामाणिक चर्चा करणे

 • मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशकांकडून वेळेवर उपचारासंबंधी मदत मिळवणे

loading image
go to top