घाबरू नका! 140 क्रमांकाबाबतचे मेसेज या निव्वळ अफवा..पण 'ही' खबरदारी नक्की घ्या..

अनीश पाटील 
Saturday, 11 July 2020

140 या अंकाने  सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांका वरून आलेला दूरध्वनी घेऊन घेतला तर, आपल्या खात्यातील सर्व पैसे  काढले जाऊन अकाउंट शून्य होते असे जे संदेश समाज माध्यमावर  फिरत आहेत,

मुंबई: 140 या अंकाने  सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांका वरून आलेला दूरध्वनी घेऊन घेतला तर, आपल्या खात्यातील सर्व पैसे  काढले जाऊन अकाउंट शून्य होते असे जे संदेश समाज माध्यमावर  फिरत आहेत, ती निव्वळ अफवा आहे. एका वाहिनीचा पब्लिसिटीचा भाग होता, असे निष्पन्न झाले आहे, असे महाराष्ट्र सायबर विभागाकडून सांगण्यात आले.

 हेही वाचा: मनसेचे पुन्हा खळखट्याक;  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून संताप...

त्या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नसून  जोपर्यंत आपण, बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा  क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड चे पूर्ण नंबर तसेच  सी. व्ही. व्ही. पिन नंबर  शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाकडून सांगण्यात आले.

काय होता मेसेज:

'आपल्याला ±140 या नंबर चा फोन आल्यास घेऊ नये. आत्ताच मेसेज झाला असून त्या प्रमाणे मुंबईत सर्व लोकांना PA सिस्टिम वर अनाऊंन्स करून सांगितले जात आहे. बहुदा तुमचे अकाउंट खाली होईल. काळजी घ्या. दुसऱ्याला पण सांगा'. अशाप्रकारचा हा मेसेज होता. मात्र हा मेसेज म्हणजे निव्वळ अफवा आहे हे आता  स्पष्ट झालं आहे. 

हेही वाचा: मोठी बातमी! गणेशोत्सव मंडळांसाठी गृहविभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर; वाचा काय आहेत नियम .. 

 जर आपणास 140 ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून फोन कॉल आला तर घाबरु नये. पॅनिक होऊ नये.  हे क्रमांक टेलिमार्केटिंग करिता दिले गेलेले असतात.  परंतु हे देखील लक्षात ठेवावे की, अशा किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून फोन कॉल आल्यास व ओटीपी सह आपली वैयक्तिक माहिती,  बँक डिटेल्स, डेबिट,क्रेडिट  कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल  तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट क्रेडिट कार्डची माहिती  अथवा पिन नंबर, ओटीपी देऊ नये  अथवा दिला जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

messages of 140 numbers are just rumors


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: messages of 140 numbers are just rumors