मनसेचे पुन्हा खळखट्याक;  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून संताप...

अनिश पाटील
शनिवार, 11 जुलै 2020

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेली स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ विरोधात सर्वत्र संतापची लाट उसळली असतानाच मनसेने संबंधीत स्टुडिओची तोडफोड केली आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेली स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ विरोधात सर्वत्र संतापची लाट उसळली असतानाच मनसेने संबंधीत स्टुडिओची तोडफोड केली आहे. यानंतर जोशुआकडून तिच्या वक्तव्याबद्दल माफीनामा लिहून घेण्यात आला आहे.

कोरोनामुळे दंतवैद्यकांपुढे संकटांचा डोंगर; कठोर उपाययोजनांसह खर्चही वाढला....

मनसैनिक यश रानडे यांनी फेसबुक लाईव्ह करून तोडफोडीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मनसेच्या काही कार्यकर्त्यांकडून संबंधित स्टुडिओची तोडफोड करण्यात येत असल्याचं दिसत आहे. तसेच यश रानडे हे जोशुआला लिखित स्वरूपात माफीही मागण्यास सांगितले  आहे. दरम्यान, मनसेच्या इशाऱ्यानंतर अग्रिमा जोशुआ हिनं लिखित स्वरूपात माफीनामाही सादर केला आहे. याशिवाय ट्विटरवरूनही महाराजांबद्दलच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहेत. तेथेही नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरून ट्रोल केले आहे.

पुनःश्च लॉकडाऊन : १९ जुलैपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये 'या' गोष्टी राहणार सुरु, 'या' राहणार बंद

खार (पश्चिम) येथे हा स्टुडिओ असल्याचे समजले. त्यात शुक्रवारी मनसे पदाधिकारी शिरले व त्यांनी तेथे तोडफोड करून अग्रिमा व शोच्या निर्मात्याला बोलवण्याची मागणी केली. बराच काळ झालेल्या या वादानंतर अग्रिमाकडून लिखीत माफीनामा घेण्यात आला. अग्रिमाचा या शोचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात शिवाजी महाराजांबद्दल तिने केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अग्रिमावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र राज्याच्या गृहमंत्र्यांना लिहिलं आहे. तसेच यासंदर्भातील एक व्हिडिओही सरनाईक यांनी सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला आहे.

कोण आहे अग्रीमा जोशुआ?
अग्रीमा जोशुआ ही लष्करी कुटुंबातील मुलगी आहे. ती स्टँडअप कॉमेडीयन होण्यापूर्वी इंजिनीअरिंग करत होती.  ती मूळची लखनऊची आहे. काही वर्षांपूर्वी ती आपल्या पालकांसह पुण्यात राहायला आली. त्यानंतर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी ती मुंबईत आली. सन 2013 मध्ये तिने इंजिनियरिंगचे शिक्षण सोडले. त्यानंतर डिजिटल मार्केटिंग करीत होती आणि सायंकाळी फावल्या वेळात ती कॉमेडी करायची. 

शाब्बास! धारावीतील संसर्ग नियंत्रणात आणल्यामुळे WHO कडून कौतुकाची थाप

बऱ्याच क्षेत्रात काही तरी करण्याचा व शिकण्याचा प्रयत्न केल्यानंतर शेवटी ती स्टॅडअप काॅमेडीकडे वळली. आता  ती एक स्टँडअप कॉमेडीयन आहे. जोशुआ आता दिवसभर एका डिजिटल मार्केटिंग एजन्सीसाठी प्रोड्युसर म्हणून काम करते आणि रात्री स्टँडअप कॉमिक. तिने 2015 मध्ये स्टँडअप कॉमेडी करायला सुरुवात केली. अनेक स्टँडअप कॉमेडी शोज तिने आत्तापर्यंत केले आहेत. 'द हॅबिटॅट' सारख्या नामांकित कार्यक्रमातसुद्धा ती परफॉर्म करत असते. 

'लेट अवर कॉमेडी', 'बरबादियोंका जशन', 'डेट नाईट', 'पॉलीटिकल जोक्स ओन्ली-द स्टॅण्डअप कॉमेडी' असे काही शोज् तिने केलेले आहेत. तिचा पहिला व्हिडिओ 'यूपी इज टेक्सास ऑफ इंडिया' असून त्याने आतापर्यंत जवळजवळ दहा लाख व्यूज मिळवले आहेत. अग्रीमा आता मुंबईतील ओपन माइक आणि शोकेस लाइनअपवरील एक नियमित नाव आहे. 
---
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns karyakarta brokes studio in mumbai, where standup comedian make statement on chhatrapati shivaji maharaj