.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Crime
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील तरटगाव येथील ट्रॅक्टर चालक अरविंद बाळू मस्के (वय २७) या तरुणाची माळुंब्रा (ता. तुळजापूर) येथील ४२ वर्षीय महिलेसोबत ओळख झाली. महिलेचा पती, मुलगा व इतरांनी अरविंदला १५ ऑगस्ट रोजी बेदम मारहाण केली. यात शनिवारी (ता. २२) उपचारादरम्यान अरविंदचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या आईने तामलवाडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
तरटगाव येथील अरविंद आई-वडिलांना एकुलता एक होता. काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या माळुंब्रा येथील एका महिलेसोबत अरविंद तीन महिन्यांपासून फोनवर बोलत होता. एप्रिलमध्ये ती महिला अरविंदच्या घरी आली आणि दोन दिवस मुक्कामी राहिली. त्यानंतर काही दिवसांनी ती पुन्हा अरविंदकडे आली आणि लग्नासाठी आग्रह करू लागली. दीड महिन्यांपूर्वी ती पुन्हा आली आणि सासरी गेलीच नाही. महिलेचा पती तिला न्यायला आल्यावर तिने जाण्यास नकार देत जिवाचे बरे-वाईट करण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेचा पती तेथून निघून गेला. काही दिवसांनी पुन्हा महिलेचा पती, मुलगा व अन्य काहीजण तरटगावला आले, पण तेव्हा महिला घरी नव्हती. १३ ऑगस्टला अरविंद घरी आला आणि महिलेने भेटायला बोलावल्याचे त्याने आईला सांगितले.
१५ ऑगस्टला अरविंद महिलेला भेटायला म्हणून घराबाहेर पडला. महिलेचा पती, मुलगा व त्यांच्या अन्य साथीदारांनी मिळून अरविंदला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला आणि महिलेचा पती, मुलगा त्याला घेऊन तामलवाडी पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्याला उपचाराची गरज असल्याने अरविंदला उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. २२ ऑगस्टला उपचारादरम्यान अरविंदचा मृत्यू झाला. त्याच्या आईच्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक मनोहर पाटील करीत आहेत.
मारहाण करून संशयित पोलिस ठाण्यात
माळुंब्रा गावाकडे येणाऱ्या रोडवरच १५ ऑगस्ट रोजी महिलेचा पती, मुलगा व इतरांनी अरविंदला वायर, लाकडाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अरविंदला घेऊन संशयित आरोपी पोलिस ठाण्यात स्वत: हजर झाले होते. त्या महिलेसोबत मृत अरविंदची ओळख इन्स्टाग्रामवरून झाली होती, असेही पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.