राज्यात पावसाचा जोर वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

सध्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान आहे. अधूनमधून ऊन पडत असले तरी सायंकाळी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे.

पुणे - बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात येत्या रविवारी (ता.) पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी येत्या शनिवारी (ता. 19) मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान आहे. अधूनमधून ऊन पडत असले तरी सायंकाळी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भात काही प्रमाणात पावसाची उघडीप आहे. रविवारी (ता.) आणि सोमवारी (ता.) कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार तर मराठवाडा व विदर्भात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडेल. मंगळवारी (ता.) राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता असून अनेक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पडेल. पुणे परिसरातही ढगाळ हवामान राहणार असून अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात पुढील तीन दिवस मध्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर, पुण्याच्या परिसरातील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसची दमदार हजेरी लागेल, असेही खात्याने सांगितले. शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, आकाश ढगाळ आहे. हवेतील आद्रतेचे प्रमाणही 84 टक्के आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा एक अंश सेल्सिअसने कमी होऊन 29.3 अंश सेल्सिअस नोंदला गेला. पुण्यात आतापर्यंत 729.5 मिलीमीटर पाऊस पडला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meteorological department has forecast further increase in rainfall in the state