मॉन्सून पोचला पूर्ण देशभरात 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज शनिवारी (ता. 27) तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस हजेरी लावेल.

पुणे -  मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे शुक्रवारी दुपारी हवामान खात्याने जाहीर केले. केरळ ते राजस्थान हा सरासरी 38 दिवसांचा प्रवास मॉन्सूनने अवघ्या 25 दिवसांमध्ये पूर्ण केला. मात्र, राज्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

यंदा 1 जूनला मॉन्सूनने केरळमध्ये सलामी दिली होती. या दरम्यान अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीला वेग आला. एका झेपेत त्याने कारवारपर्यंत मजल पूर्ण केली. त्यानंतर 14 जूनला त्याने महाराष्ट्र व्यापला. या दरम्यान मॉन्सूनचा वेग मंदावला; पण सुरवातीला मिळालेल्या गतीमुळे सरासरी वेळेच्या 12 दिवस आधी मॉन्सूनने देश व्यापला असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. हवामान खात्याने जाहीर केलेल्या मॉन्सूनच्या नवीन तारखांप्रमाणे 8 जुलै ही संपूर्ण भारत व्यापण्याची सरासरी तारीख आहे. यंदा 12 दिवस आधीच ती गाठली. 

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या शनिवारी (ता. 27) तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस हजेरी लावेल, असेही स्पष्ट करण्यात आले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात आजपासून पाऊस 
पुणे शहर आणि परिसरात मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. येत्या शनिवारी (ता. 27) ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडतील. त्यानंतर पुढील तीन दिवस म्हणजे येत्या रविवारपासून (ता. 28) मंगळवारपर्यंत (ता. 30) हलक्‍या ते मध्यम पावसाच्या सरी येतील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meteorological department said the monsoon covered the entire country