म्हाडाची परीक्षा ढकलली पुढे; MPSCची ढकललेली परीक्षा होती त्याच दिवशी

mhada
mhadasakal media

मुंबई: 29 जानेवारी 2022 रोजी PSI या पदाची मुख्य परीक्षा आहे आणि त्याच दिवशी म्हाडाचे सुद्धा पेपर सुरू होणार आहेत. यामुळे बरेच मुले परीक्षेस मुकण्याची शक्यता होती. ही शक्यता लक्षात घेता विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. ती विनंती आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मान्य करत परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत.

२९ आणि ३० जानेवारी रोजी एमपीएससीची परीक्षा असल्यामुळे म्हाडाने त्या दिवसांची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. ती मागणी मान्य करत परीक्षा पुढे ढकलल्या असून या परीक्षांची नवीन, जवळीलच तारीख लवकर जाहीर करण्यात येणार आहे, असं म्हाडाकडून कळवण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com