राणा म्हणजे, देवेंद्र फडणवीसांनी तयार केलेलं बुजगावणं; बच्चू कडूंचा जोरदार प्रहार I Bachchu Kadu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bachchu Kadu

नवनीत राणा यांनी तुरुंगात अपमानास्पद वागणूक मिळाल्याची तक्रार केलीय.

राणा म्हणजे, देवेंद्र फडणवीसांनी तयार केलेलं बुजगावणं : बच्चू कडू

अमरावती : 'हनुमान चालिसा' (Hanuman Chalisa) हा भाजपचा (BJP) अजेंडा असून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावायचा भाजपचा डाव असल्याचा आरोप राज्याचे मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलाय. राणा दाम्पत्याला अमरावतीमधून मुंबईत जाऊन हनुमान चालीसा म्हणायची काय गरज. भक्ती म्हणजे प्रदर्शन असतं का? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केलाय.

राणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे घेऊन मतं मागितली. तेव्हा मस्जिद, बौद्ध विहारमध्ये गेले. काजीला आणलं होतं. मात्र, आता त्यांनी भूमिका बदलली. आधी शिवसेना-भाजप विरोधात मतं मागितली. आता भाजपच्या दावणीला बांधले गेले आणि शिवसेनेला (Shiv Sena) बदनाम करत आहेत. राष्ट्रपती (NCP) राजवटीची मागणी करत आहे. पण, याचे परिणाम राणा यांना आगामी निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिलाय.

हेही वाचा: काँग्रेसची 'ऑफर' नाकारल्यानंतर सिध्दूंनी घेतली पीकेंची भेट

नवनीत राणा (Navneet Rana) यांनी तुरुंगात अपमानास्पद वागणूक मिळाल्याची तक्रार केलीय. त्यावर राणा म्हणजे, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) तयार केलेलं बुजगावणं आहे, असं बच्चू कडू म्हणाले. राणा हे कलाकार आहेत. त्यांना रडायचं कधी हसायचं कधी हे चांगलंच जमतं. जेलमध्ये काही फाईव्ह स्टार व्यवस्था मिळणार का? जे सामान्य कैद्यांना ते राणा यांना मिळणार आहे. कारागृहात सर्वसामान्य कैद्याप्रमाणंचं राणांना जीवन काढावं लागेल, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Minister Bachchu Kadu Criticizes Navneet Rana And Ravi Rana At Amravati

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top