विद्यापीठांच्या कारभारावरुन मंत्री Chandrakant Patil झाले हतबल ; वाचा नक्की काय आहे प्रकरण !

Chandrakant Patil
Chandrakant Patilsakal

Chandrakant Patil | नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी (एनईपी) राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी अजूनही आपली तयारी योग्य प्रकारे सुरू न केल्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हतबल झाले आहेत.

अंमलबजावणीबाबतचा आढावा घेत त्यांनी विद्यापीठांनी शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपद्धतीचे अचूक नियोजन करावे आणि नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आदेश आज दिले.

मुंबईत झालेल्या एका बैठकीत राज्यातील विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यात बहुतांश विद्यापीठांकडून सप्टेंबर उलटला तरी एनईपीच्या अंमलबजावणीबाबत आराखडा, उपाययोजना आणि तयारीसंदर्भात मोठी निराशा दिसली.

त्यामुळे पाटील यांनी विद्यापीठांना अंमलबजावणीसाठी आदेश दिले आहेत.
राज्यातील विद्यापीठांनी मेपर्यंत नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात कोणतीच तयारी केली नसल्याने त्याबाबतची अट यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शिथिल करण्यात आली होती.

Chandrakant Patil
Sakal Podcast : केसरकर म्हणतात कमळावरही लढू ते ड्रग्ज माफिया प्रकरणी दादा भुसेंवर आरोप

पुढील शैक्षणिक वर्षात सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये धोरणाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विद्यापीठांनी संभाव्य अडचणींचा आणि उपाययोजनांचा अभ्यास करून ३१ डिसेंबरपर्यंत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अंतिम आराखडा व अनुषंगिक धोरण तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र काही अपवाद वगळता एकाही विद्यापीठाने संभाव्य अडचणी आणि त्यासाठीच्या तयारीची समर्थता दाखवली नसल्याने पाटील हतबल झाले असल्याचे अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.

धोरणाबाबत जनजागृती करा!
आज झालेल्या बैठकीनंतर एनईपीच्या अंमलबजावणीबाबत वेग येणे अपेक्षित आहे. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने वारंवार बैठका घेऊन विचारमंथन करावे आणि अंमलबजावणीमध्ये काय अडचणी आहेत याबाबत सूचना कराव्यात. प्रत्येक जिल्ह्यात नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात वारंवार बैठका घेऊन त्याबाबत जनजागृती करावी, असे आदेशही चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

Chandrakant Patil
Sakal Exclusive : शहरात भाजीपाला, कपड्यांचा कचरा अधिक; ओला 60, तर कोरडा कचऱ्याचे 40 टक्के संकलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com