esakal | 'नागरिकांच्या आरोग्यासमोर खर्चाचा प्रश्न दुय्यम' - महसुल मंत्री बाळासाहेब थोरात

बोलून बातमी शोधा

null
'नागरिकांच्या आरोग्यासमोर खर्चाचा प्रश्न दुय्यम' - महसुल मंत्री बाळासाहेब थोरात
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लॉकडाऊनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. बैठकीत आज १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असल्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. या लसीकरणामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे साडेसहा हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे.. यासंदर्भात महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, काँग्रेसची आणि सोनिया गांधी यांची पहिल्यापासूनच ही मागणी आहे की लशीकरणाची जबाबदारी ही शासनाची आहे आणि ती शासनाने स्विकारली पाहिजे आणि ते केलंही पाहिजे. यासंदर्भातच आम्ही मुख्यामंत्र्यांकडे हा आग्रह धरला होता. आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत देखील सगळ्यांची हीच मागणी होती, त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रासाठी खुशखबर! सर्वांना मिळणार मोफत लस

लशीकरणासाठी 6 हजार पाचशे कोटी उभे करावे लागणार आहेत. राज्यासमोर अनेक आर्थिक अडचणी असल्या तरी आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे, ही सरकारची भुमिका आहे. त्यासाठीच लशीकरण मोफत करण्याची शासनाची तयारी आहे. राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासमोर खर्चाचा प्रश्न अशावेळी दुय्यम ठरतो, असंही ते म्हणाले आहेत.

लॉकडाऊन वाढवला जाईल का?

यासंदर्भात बाळासाहेब थोरात म्हणाले की, संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी काही काळाकरता म्हणजेच 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढू शकतो. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, राज्यात कोरोनाचा प्रकोप अजून थांबलेला नाही. दररोज 60 हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद लॉकडाऊनच्या काळात मिळालेला नाही. लोक सर्रासपणे कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहेत. अशात राज्यात लॉकडाऊन वाढवला जाण्याची दाट शक्यता होती. राजेश टोपे यांनी हीच शक्यता बोलून दाखवली. लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय जवळजवळ निश्चित आहे. पण, तो किती दिवस वाढवायचा याबाबत अंतिम निर्णय शेवटच्या दिवशी घेण्यात येईल, असं ते म्हणाले आहेत.